सहकारी संस्थांनी आधुनिकीकरणाद्वारे उत्पन्नाचे स्त्रोत वाढवावेत – सतीश मराठे
इचलकरंजी –
अर्थविषयक बाजारातील स्पर्धात्मकता वाढत चालली असताना सहकारी संस्थांनी आधुनिकीकरणाचा मार्ग स्वीकारतानाच उत्पन्नाचे नवनवे स्त्रोत वाढवून सक्षम होण्याकडे लक्ष दिले पाहिजे, असे प्रतिपादन भारतीय रिझर्व बँकेचे संचालक, सहकार भारतीचे संस्थापक सदस्य सतीश मराठे यांनी व्यक्त केले.
ADvt
सहकार भारतीच्या कोल्हापूर विभागातील सदस्यांचे दोन दिवशीय अभ्यास वर्ग श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडले. यावेळी मार्गदर्शन करताना श्री. मराठे बोलत होते.
ते म्हणाले. भारतातील सहकार क्षेत्र व्यापक आहे. त्याचा इतिहासही मोठा आहे. सहकार कायद्यात काळानुरूप बदल होण्याचीही गरज आहे. राजकारणाच्या विळख्यात अडकलेला सहकार कायदा हा अधिक सुटसुटीत, समृद्ध झाला पाहिजे. यासाठी केंद्र व राज्य पातळीवरून अनुरूप बदल होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
ADvt
या अभ्यास वर्गाचे उद्घाटन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विभाग सहकार्यवाह भगतराम छाबडा, कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांच्या हस्ते झाले. त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.
अभ्यास वर्गामध्ये सहकार भारतीचे राज्य महामंत्री विवेक जुगादे, प्रा. शरद जाधव ,सांगली जिल्हा अध्यक्ष संजय परमने, सहकार भारतीच्या महिला राज्याध्यक्ष वैशाली आवाडे, श्रीकांत पटवर्धन, औदुंबर नाईक, तसेच प्रवीण बुलाख, एड. जवाहर छाबडा, कोल्हापूर जिल्हा अध्यक्ष अरविंद मजलेकर, महाराष्ट्र राज्य पतसंस्था प्रकोष्ट सागर चौगुले, कोल्हापूर विभाग प्रमुख चंद्रकांत धुलप, जिल्हा संघटक सागर हुपरे आदींनी मार्गदर्शन केले. गटचर्चा. सांस्कृतिक कार्यक्रम यामध्ये अनेक सदस्यांनी सहभाग नोंदवला.महामंत्री श्रीकांत चौगुले यांनी आभार मानले व कोल्हापूर जिल्हा सहसंघटक संजय सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. कोल्हापूर, सांगली व सातारा या तीन जिल्ह्यातील सहकार भारतीच्या कार्यकर्ते या अभ्यास वर्गात सहभागी झाले होते.
फोटो -सहकार भारतीच्या अभ्यास वर्गात मार्गदर्शन करताना सतीश मराठे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







