ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीच्या कचऱ्याची अवस्था-आरोग्य अधिकारी करतात तरी काय?

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

रिक्रेशन हॉल जवळील कचरा व झोपलेले प्रशासन..

बघा व्हिडीओ

https://youtube.com/shorts/RaJWy4dFrGY?si=VIEYsbW3wqPnOneg

 

इचलकरंजीच्या कचऱ्याची अवस्था-आरोग्य अधिकारी करतात तरी काय?
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका क्षेत्रात ७ कोटी रुपयांचे वार्षिक कचरा संकननाचे टेंडर असून कागदोपत्री ६८ घंटागाड्या द्वारे हे काम केले जाते.
नुकताच महापालिकेने २५ ठिकाणी ब्लॅक स्पॉट ब्युटीफिकेशन आयोजित करून कचरा कोंडावळे कमी करण्याचा प्रयत्न केला.तरीही गावात ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसत असून साफसफाई वर कोणत्याही प्रकारचे नियंत्रण दिसून येत नाही..
मागील आयुक्तांनी दर शुक्रवारी सुरू केलेले संगु गुरुजी ट्रस्ट सोबतचे महासफाई अभियान २-४ वेळा फोटो काढून गुंडाळले.
रिक्रेशन हॉल नजीक पडलेले कचऱ्याचे ढीग व साठलेला कचरा बघितला तर महापालिकेच्या कामाची प्रचिती येते.
इचलकरंजी महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ.सुनीलदत्त संगेवार याकडे लक्ष देणार का?समस्या सोडवणार का याबाबत नागरिक संभ्रमावस्थेत असून लवकरच कचरा प्रकरणी मोठे आंदोलन करण्याची तयारी भागातील नागरिकांनी सुरू केली आहे..

 

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा