रिक्षाचालकाचा मुलगा आशुतोष चंदूरे झाला सीए
इचलकरंजी:
येथील आयजीएम दवाखाना परिसरात राहणारे रिक्षाचालक सुरेश चंदूरे यांचा मुलगा आशुतोष चंदूरे याने काल जाहीर झालेल्या सीए परिक्षेच्या निकालामध्ये सीए परिक्षा उत्तीर्ण झाला.त्यामुळे त्याचे व परीवाराचे परिसरात कौतुक होत आहे.
आशुतोष हा सुरवाती पासून कष्ट करून शिक्षण घेत होता सुरुवातीला वृत्तपत्र वाटपा बरोबर स्टेशनरी दुकानात कामाला जाऊन आपले शिक्षण पूर्ण केले व परिवाराला यातुन हातभार लावत होता. वडिल सुरेश हे सकाळ पासुन रिक्षा चालवत असतात तर आई कविता चंदूरे ह्या घरामध्ये गारमेट उद्योगाच्या माध्यमातून कपडे शिलाईचे काम करतात.

ADvt
मुलाच्या ह्या यशामुळे मुलाने केलेल्या कष्टाचे फळ त्याला मिळाले अशी भावना आई व वडिल व्यक्त करताना त्याच्या डोळ्यांत आनंद दिसत होता . आशुतोषच्या या यशाने त्याचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800