कबनूर येथे महिलेच्या विनयभंगप्रकरणी गुन्हा दाखल
इचलकरंजी
.कबनूर येथील एका महिलेला रस्त्यात अडवून तिच्यासोबत गैरवर्तन केल्याप्रकरणी मुकेश कुरणे (वय ३६, रा. आंबेडकर चौक, कबनूर) याच्याविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.
Advt
दि. १० जुलै रोजी रात्री ८.३० वाजता फिर्यादी महिला घरी जात असताना रस्त्यात आरोपीने त्यांचा पाठलाग करत त्यांना अडवले. “तुला माझा मोबाईल नंबर पाहिजे का?” असे विचारून, गैरवर्तन केल्याचे महिलेने दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे.
तक्रारीवरून पोहेकॉ. नितीन चोथे यांनी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणाचा तपास पो.नि. दिलीप पवार सहाय्यक पोलीस निरीक्षक वायदंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







