इचलकरंजी महानगरपालिकेचा मालमत्ता कर सवलतीस उत्स्फूर्त प्रतिसाद, मुदत ३१ जुलैपर्यंत वाढवली.
इचलकरंजी
इचलकरंजी महानगरपालिका मालमत्ता कर विभागाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षातील कर संकलनास सुरुवात केली असून, मिळकतधारकांसाठी संयुक्त करामध्ये १०% सवलत देण्यात आली होती. ही सवलत १५ जुलै २०२५ पर्यंत लागू होती. नागरिकांनी या सवलतीला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून,आतापर्यंत ६८५१ मिळकतधारकांनी कर सवलतीचा लाभ घेतला आहे.
१५ जुलै २०२५ रोजीपर्यंत एकूण वसूली ११ कोटी ९६ लाख इतकी झाली असून १५ जुलै रोजी १ कोटी ३३ लाख रुपये रोख तर चेकद्वारे ३३ लाख ५५ हजार रुपये जमा झाले आहेत
या उत्कृष्ट प्रतिसादामुळे महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक श्रीमती पल्लवी पाटील यांनी सवलतीची मुदत ३१ जुलै २०२५ पर्यंत वाढवली असून, नागरिकांनी या संधीचा अधिकाधिक लाभ घ्यावा असे आवाहन केले आहे.
इनामची मुदतवाढीची मागणी-
अवघ्या १० टक्के मिळकतधारकांनी १४ जुलै पर्यत लाभ घेतला असल्याने किमान १ महिना मुदतवाढ देऊन जास्त मिळकतधारकांना सवलतीचा लाभ देण्यात यावा अशी मागणी इनामने आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली होत..१५ दिवस मुदतवाढ मिळाल्याने मिळकतधारकांना सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







