ICHMH51NEWS.IN
9921600800

इमनपाचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना मानद डॉक्टरेट प्रशासनाने केला सत्कार

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इमनपाचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे यांना मानद डॉक्टरेट प्रशासनाने केला सत्कार

इचलकरंजी
    इचलकरंजी महानगरपालिकेचे अष्टपैलू व्यक्तिमत्व शाखा अभियंता बाजीराव तथा बाजी कांबळे यांना त्यांनी इंजीनियरिंग क्षेत्रात दिलेल्या विशेष योगदाना बद्दल मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्ली यांच्याकडून मानद डॉक्टरेट पदवी देऊन सन्मानित केले आहे.
                  इचलकरंजी महानगरपालिकेचे शाखा अभियंता बाजीराव कांबळे गेल्या वीस वर्षापासून पाणीपुरवठा विभागाकडे तसेच गेल्या दोन वर्षांपासून पाणीपुरवठा विभागासह बांधकाम विभागाकडे कार्यरत आहेत. असे अष्टपैलू व्यक्तिमत्व असलेल्या बाजीराव कांबळे यांनी त्यांच्या अपुर्ण राहीलेल्या शिक्षणाच्या इच्छेनुसार त्यांनी  पाणीपुरवठा विभागाकडील दैनंदिन कामकाजामध्ये कोणताही अडथळा न येता त्यांनी स्थापत्य अभियांत्रिकी या शाखेतील पदविका तसेच पदवी प्राप्त केलेली आहे.
Advt
             महानगरपालिका कामकाजासोबतच इंजीनियरिंग आणि पर्यावरण  क्षेत्रामध्ये केलेल्या भरीव योगदानाबद्दल मॅजिक अँड आर्ट युनिव्हर्सिटी दिल्ली यांचेकडून त्यांना मानद डॉक्टरेट ही पदवी देऊन सन्मानित करण्यात आले आहे.
   यानिमित्त आज मंगळवार दि.१५ जुलै रोजी महानगर पालिकेच्या वतीने डॉ. बाजीराव कांबळे यांचाआयुक्त तथा प्रशासक पल्लवी पाटील यांच्या हस्ते आणि अतिरिक्त आयुक्त सुषमा शिंदे,उपायुक्त नंदु परळकर, उपायुक्त अशोक कुंभार, उपायुक्त राहुल मर्ढेकर, सहा.आयुक्त विद्या कदम, सहा.आयुक्त विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.
  यावेळी कार्यकारी अभियंता अभय शिरोलीकर, माहिती व जनसंपर्क अधिकारी नितिन बनगे, सदाशिव जाधव, प्रदीप झमरी, सादिक गजबर, नंदु माळगे,हर्ष माळगे, आकाश माने, प्रणव कांबळे, रोहन कुरने, जगन्नाथ सोलनकर यांचेसह महानगरपालिका अधिकारी तसेच पाणी पुरवठा विभागो कर्मचारी उपस्थित होते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा