ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीत २२ जुलै रोजी श्री व्यंकटेश महाविद्यालयात रोजगार मेळावा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीत २२ जुलै रोजी श्री व्यंकटेश महाविद्यालयात रोजगार मेळावा

कोल्हापूर जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने दिनांक २२ जुलै २०२५ रोजी इचलकरंजीतील श्री व्यंकटेश महाविद्यालयात रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.

Advt

या मेळाव्यात जिल्ह्यातील नोकरी इच्छुक युवक-युवती तसेच दिव्यांग उमेदवारांसाठी विविध नामांकित कंपन्यांमध्ये नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध व्हाव्यात याकरिता महाविद्यालयातर्फे आवश्यक व्यवस्था करण्यात येणार आहे.

हा मेळावा राज्यातील कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात येत असून, रोजगारासाठी इच्छुक युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा