शहापूर पोलिसांकडून ६.७३ लाखांचा मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज जप्त,मिशन झिरो ड्रग्ज मोहिमेअंतर्गत कारवाई; कोरोची परिसरातून एक आरोपी अटकेत
बघा व्हिडीओ
https://youtube.com/shorts/92MReGXz1pE?si=CdWHSAerXB_D7yQ_
इचलकरंजी:
कोल्हापूर जिल्ह्यात अंमली पदार्थ विरोधात सुरू असलेल्या ‘मिशन झिरो ड्रग्ज’ मोहिमेअंतर्गत शहापूर पोलिसांनी मोठी कारवाई करत ६,७३,२०० रुपयांचा अवैध मेफेड्रॉन (एम.डी.) ड्रग्ज जप्त केला आहे. या कारवाईत ऋषभ राजू खरात (वय ३०, रा. लोकमान्य नगर, कोरोची, ता. हातकणंगले) याला अटक करण्यात आली आहे.
वरील कारवाई कोरोची गाव हद्दीत साईनाथ वजन काट्याजवळ, पंचगंगा साखर कारखान्याच्या रस्त्यावर करण्यात आली. पोलिसांना पोलीस नाईक सतिश लक्ष्मण कुंभार यांच्यामार्फत गुप्त माहिती मिळाल्यानंतर त्यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचला आणि संशयित आरोपीस ताब्यात घेतले.
कारवाईत मेफेड्रॉन (एम.डी.) अंमली पदार्थ – १३४.०४ ग्रॅम,६,७०,२००/- रोख २५०० रुपये,५०० रुपयांचे इतर साहित्य असा एकूण ६,७३,२०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
वरील कारवाईसाठी मा. पोलीस अधीक्षक योगेशकुमार गुप्ता, अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी समरसिंह साळवे यांचे मार्गदर्शन लाभले. प्रत्यक्ष कारवाईत पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी, पु.नि. महावीर कुटे, श्रीकृष्ण दरेकर, अविनाश मुंगसे, प्रमोद भांगरे, महेश कोरे, अर्जुन फातले, रोहित डावळे, सतिश कुंभार, आयुब गडकरी, शशिकांत ढोणे, होमगार्ड महेश शेळके, इम्रान मुल्ला आदींचा सहभाग होता.
सदर प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी करत आहेत.
ड्रग्ज सहित अटक केलला आरोपी व शहापूर पोलीस
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







