कबनूर येथे जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा, ९ जणांवर गुन्हा दाखल – २.१९ लाखांचा मुद्देमाल जप्त
इचलकरंजी
कबनूर (ता. हातकणंगले) येथे शिवाजीनगर पोलिसांनी तीन पत्ती नावाच्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर छापा टाकून ९ जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दि. १८ जुलै रोजी रात्री परीट गल्लीतील आरोपी रवि सुरेश परीट यांच्या मालकीच्या खोलीत तीन पत्ती जुगार खेळ सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी कारवाई करत रवि सुरेश परीट (वय ३१), गजानन गारवे, सुनिल पोमन, बाबासो आवळे, भरत रावळ, दत्तात्रय पाटील, अवधुत सुतार, मनोज देसाई व रमेश सुतार या नऊ जणांवर गुन्हा दाखल केला असून त्यांच्याकडून एकूण २,१९,३४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, त्यामध्ये १०,५४० रोख, सहा मोबाईल ६८,८००/- दोन मोटारसायकल १,४०,०००/- आणि पत्याची पाने असा समावेश आहे. या प्रकरणी पो.ना. सुनिल बाईत यांनी फिर्याद दिली असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक भोस्कर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







