इचलकरंजीत मावा विक्रीप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील विविध पानटपऱ्यांवर अवैधरित्या तयार केलेल्या सुगंधी मावा व तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या चौघांवर शिवाजीनगर पोलिसांनी कारवाई केली आहे. दि. १८ जुलै रोजी संध्याकाळी ७.३० ते ९.०० दरम्यान आभार फाटा चौक येथील डी.जे. पान शॉप आणि बाळूमामा पान शॉप, सहारानगर रुई येथील एस.एम. पान शॉप, तसेच तांबेमळा टेम्पो अड्डा येथील नरेंद्र हौसिंग सोसायटी शेजारील टपरी येथे ही कारवाई करण्यात आली. आरोपी दस्तगीर जमादार, निलेश पाटील, अरबाज मुजावर व जमीर शेख यांच्या ताब्यातून सुगंधी सुपारी, तंबाखू, वेगवेगळ्या पत्त्यांचे मिश्रण असलेला मावा, तयार मावा (५०० ग्रॅम), व रोख ₹२,९०० असा एकूण ₹४,३४० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी विविध कायद्याखाली गुन्हा दाखल असून तपास सपोनि वायदंडे करीत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







