पेन्शन वाढीमुळे दिव्यांग बांधवांचा भाजप कार्यालयात आनंदोत्सव
इचलकरंजी :
महाराष्ट्र शासनाने दिव्यांग बांधवांची पेन्शन रु. १,५०० वरून थेट रु. २,५०० पर्यंत वाढविल्याने इचलकरंजीतील दिव्यांग बांधवांनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हळवणकर व माजी संजय गांधी निराधार कमिटी अध्यक्ष अनिल डाळ्या यांचे विशेष आभार मानत दिव्यांग बांधवांनी भाजप कार्यालयात साखर वाटून आनंदोत्सव साजरा केला.
दिव्यांगांच्या पेन्शन वाढीची ही मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित होती. संजय गांधी निराधार योजना मंजुरी पत्र वाटप प्रसंगी भाजपा नेते अनिल डाळ्या यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोर इचलकरंजीचे लोकप्रिय आमदार डॉ. राहुल आवाडे यांच्या मार्फत ही मागणी मांडली होती. या मागणीला यश मिळाल्याने शासनाने दिव्यांग पेन्शनमध्ये एक हजार रुपयांची भरीव वाढ जाहीर केली. या निर्णयामुळे राज्यातील दिव्यांगांमध्ये समाधानाचे व आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Advt
या प्रसंगी सावली दिव्यांग संस्थेचे अध्यक्ष राजकुमार गेजगे, भाजपा दिव्यांग आघाडी अध्यक्ष दीपक लोखंडे, दिव्यांग सेवा संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील, भाजप शहर उपाध्यक्ष प्रदीप मळगे आदींनी मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमावेळी महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघटनेचे सदस्य अमृत मामा भोसले, मनोज हिंगमिरे, इचलकरंजी पश्चिम भाजप अध्यक्ष शशिकांत मोहिते, माजी उपनगराध्यक्ष तानाजी पोवार, किसन शिंदे, धोंडीराम जावळे, संजय नागुरे, युवराज माळी, नितीन चव्हाण, सलीम शिकलगार, मोहन साखरे, राजू गुरव, दीपक निर्मळे, शहाजान टाकळगी व इतर मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दिव्यांग बांधवांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारा हा निर्णय ऐतिहासिक ठरत असून, या निर्णयाबद्दल शासनाचे व भाजप नेत्यांचे दिव्यांग बांधवांनी विशेष आभार मानले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







