मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त इचलकरंजीत ४२९ जणांचे रक्तदान.
भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, महाराष्ट्राचे धडाडीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त भारतीय जनता पार्टी इचलकरंजीच्या वतीने घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबीरास पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तिन्ही मंडलात उदंड व उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. दिवसभरात तब्बल ४२९ दात्यांनी रक्तदान केले.
मंगळवार २२ जुलै मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत भारतीय जनता पार्टीचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या सुचनेनुसार कोणताही गाजावाजा, जाहिरातबाजी न करता सामाजिक बांधिलकी जोपासत आणि रक्ताच्या तुटवड्याची गरज ओळखून रक्तदान शिबीर घेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार इचलकरंजीत भारतीय जनता पार्टी पूर्व, पश्चिम आणि ग्रामीण या तिन्ही मंडलच्या वतीने रक्तदान शिबीर घेण्यात आले. भाजपा इचलकरंजी पूर्व मंडलच्या वतीने आमदार डॉ. राहुल आवाडे जनसंपर्क कार्यालय, इचलकरंजी पश्चिम मंडलच्या वतीने भाजपा शहर कार्यालय आणि भाजपा ग्रामीण मंडलच्या वतीने कोरोची येथील हनुमान मंदिर हॉल याठिकाणी रक्तदान शिबीर घेण्यात आले.
या शिबीराचा शुभारंभ आमदार राहुल आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर, भाजपा जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आला. जनसंपर्क कार्यालयात २२२ भाजपा शहर कार्यालयात १०३ आणि कोरोची येथे १०४ दात्यांनी रक्तदान केले. या शिबीरासाठी लायन्स ब्लड बँक आणि आधार ब्लड बँक यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी प्रकाश दत्तवाडे, भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे, पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते, ग्रामीण मंडल अध्यक्ष बाळासाहेब माने, शेखर शहा, तानाजी पोवार, अरविंद शर्मा, अशोक स्वामी, पै. अमृत भोसले, मनोज हिंगमिरे, शहाजी भोसले, बाळासाहेब कलागते, पांडुरंग म्हातुकडे, दीपक सुर्वे, रवी जावळे, राजू बोंद्रे, म्हाळसाकांत कवडे, दिलीप मुथा, राहुल घाट, सतिश मुळीक, अर्चना कुडचे, सपना भिसे, नागुबाई लोंढे, योगिता दाभोळे, सीमा कमते, मंगल सुर्वे, निता भोसले, रंजना डावरे, श्रीकांत टेके, राहुल घाट, सचिन हेरवाडे, कपिल शेटके, उमाकांत दाभोळे, प्रमोद बचाटे, मारुती पाथरवट, शुभम बरगे, सुशांत बेडक्याळे आदींसह पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. तर कोरोची येथील कार्यक्रमात विजया पाटील, प्रसाद खोबरे, महेश पाटील, संजय शहापुरे, सचिन पवळे, सुलोचना कट्टी, सुधीर लिगाडे, संगीता कांबळे, अभिनंदन पाटील, सनी ओऊळकर, शितल पाटील, विकी माने, अश्विनी चव्हाण, पुजा टेळे, सीमा पाटील, सुनिता सुतार, कोमल कांबळे, साहेबलाल शेख, मेघा दावणे, आनंदी आमते, सरीता दावणे, सरीता कडाले, रवी कांबळे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








