इचलकरंजीत दत्ताजीराव कदम लॉ कॉलेजचे ३० जुलै रोजी उद्घाटन
इचलकरंजी :
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या वतीने इचलकरंजी येथे नवे विधी शिक्षण केंद्र स्थापन होत असून दत्ताजीराव कदम लॉ कॉलेज चे उद्घाटन बुधवार, दिनांक ३० जुलै २०२५ रोजी सकाळी १०.३० वाजता जुना कोल्हापूर नाका, शिवाजी नगर येथे संपन्न होणार असल्याची माहिती कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
Advt
उद्घाटन समारंभ मा. प्रकाशआण्णा आवाडे (माजी मंत्री) आणि मा. श्रीमती निवेदिता माने (माजी खासदार) यांच्या शुभहस्ते होणार असून अध्यक्षस्थानी संस्थेचे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे असणार आहेत. प्रमुख उपस्थितीत सेक्रेटरी प्राचार्या शुभांगी गावडे, सीईओ कौस्तुभ गावडे, सहसचिव प्राचार्य सिताराम गवळी, अर्थसहसचिव प्राचार्य डॉ. मिलिंद हुजरे, कोल्हापूर विभागप्रमुख श्रीराम साळुंखे यांचा समावेश आहे.
ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षणप्रसार या ध्येयाने प्रेरित होऊन शिक्षणमहर्षी डॉ. बापूजी साळुंखे यांनी स्थापन केलेल्या संस्थेच्या माध्यमातून १९६२ पासून इचलकरंजीत विविध शिक्षणसंस्था यशस्वीरित्या कार्यरत आहेत. आता विधी शिक्षणाचा समावेश होत असल्याने इचलकरंजी परिसरातील विद्यार्थ्यांना कायदा क्षेत्रात करीयरची नवी संधी मिळणार आहे.
या महाविद्यालयात पाच वर्षांचा बी.ए.एलएल.बी. इंटिग्रेटेड कोर्स आणि तीन वर्षांचा एल.एल.बी. डिग्री कोर्स उपलब्ध असणार असून ते शिवाजी विद्यापीठाशी संलग्न आहेत. या अभ्यासक्रमांना बार कौन्सिल ऑफ इंडिया आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता प्राप्त असून सर्व शिष्यवृत्ती योजनाही लागू असणार आहेत.या महाविद्यालयाच्या स्थापनेसाठी महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री मा. नामदार चंद्रकांतदादा पाटील यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.कार्यक्रमास शिक्षणप्रेमी, अभ्यासक, विचारवंत, गुरुदेव कार्यकर्ते व विद्यार्थी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन महाविद्यालयाच्या प्राचार्या सी.एस. बागडी यांनी केले आहे.
यावेळी सीईओ कौस्तुभ गावडे,सहसचिव मिलिंद हुजरे, प्राचार्य एस के खाडे,लॉ कॉलेज प्राचार्य सी.एस. बागडी,सिडीसी सदस्य सुनील पाटील उपस्थित होते
पत्रकार परिषदेत बोलताना कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे व पदाधिकारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







