कोरोचीतुन दोन तरुणांकडून २ किलो २४० ग्रॅम गांजा जप्त – स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची धडक कारवाई
इचलकरंजी (शहापूर) –
कोल्हापूर जिल्ह्यात ‘मिशन झिरो ड्रग्ज’ या विशेष मोहिमेअंतर्गत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांनी शहापूर येथील पंचगंगा सहकारी साखर कारखाना परिसरात मोठी कारवाई करत २ किलो २४० ग्रॅम वजनाचा गांजा जप्त केला आहे. पोलीस अधीक्षक श्री. योगेश कुमार यांच्या सूचनेनुसार ही कारवाई करण्यात आली.
स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रविंद्र कळमकर यांच्या मार्गदर्शनाखाली गोपनीय माहितीच्या आधारे सहा. पोलीस निरीक्षक शितलकुमार कोल्हाळ यांच्या पथकाने सापळा रचून ही कारवाई केली. आरोपी अरबाज नजीर चौधरी (वय २२, रा. आझाद नगर, तारदाळ) व नियाज मोहद्दीन मुल्ला (वय २२, रा. आझाद नगर, तारदाळ) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून ५६,०००/- रुपये किमतीचा गांजा व मोटारसायकलसह एकूण १,८१,१००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
ADvt
या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास शहापूर पोलिसांकडून सुरू आहे. सदर कारवाईत पो.नि. रविंद्र कळमकर, शितलकुमार कोल्हाळ, पो.उ.नि. संतोष गळवे, पो.अं. प्रदीप पाटील, वैभव जाधव, वैभव पाटील, विशाल खराडे, शिवानंद मठपती, राजू कांबळे, योगेश गोसावी, गजानन गुरव, अरविंद पाटील, अशोक पोवार, सुशील पाटील यांनी सहभाग घेतला.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







