‘हर घर तिरंगा’ मोहिम २०२६ अंतर्गत इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने तिरंगा दौड संपन्न.
इचलकरंजी
‘हर घर तिरंगा’ मोहिम २०२५ अंतर्गत शासन निर्देशानुसार इचलकरंजी महानगर पालिकेच्या वतीने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या अनुषंगाने ‘तिरंगा दौड’ आयोजित करण्यात आलेली होती. दौडचा शुभारंभ उपायुक्त नंदु परळकर यांच्या हस्ते तसेच उपायुक्त विद्या कदम , सहा. आयुक्त रोशनी गोडे, सहा.आयुक्त विजय राजापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत श्री शिवतीर्थ या ठिकाणी करण्यात आला. शहरातील मुख्य मार्गावरून के. एल. मलाबादे चौक ते महात्मा गांधी चौक येथे दौडचा समारोप करणेत आला.
याप्रसंगी प्रशासन अधिकारी इरफान पटेल, मुख्याध्यापक शंकर पोवार, क्रीडा अधिकारी संजय शेटे, समाज विकास अधिकारी सुनील शिंदे, सहा आरोग्य अधिकारी मंगेश दुरुगकर, संदीप जोशी, दिपक खोत, सदाशिव जाधव, गणेश शिंदे, राम कांबळे, रफिक पेंढारी, संदीप मधाळे,करन लाखे, कविता सोळंकी, सचिन खोंद्रे , संजय कांबळे, अनिल कांबळे, यांचेसह शहरातील विविध शाळांचे मुख्याध्यापक शिक्षक, एन.सी.सी. विद्यार्थी , महानगर पालिका अधिकारी कर्मचारी तसेच शहरातील विविध सामाजिक- स्वयंसेवी आणि क्रीडा संस्थांचे पदाधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
तिरंगा दौड प्रसंगी इमनपा अधिकारी व कर्मचारी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800








