इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील मॅडम यांनी घेतली कोल्हापूर जिल्ह्याच्या नूतन जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांची भेट
इचलकरंजी:
इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील मॅडम यांनी कोल्हापूर जिल्ह्याचे नूतन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.प्रशांत वाडीकर यांची भेट घेऊन त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सदरच्या झालेल्या भेटीमध्ये वैद्यकीय अधिक्षक डॉ.भाग्यरेखा पाटील यांनी इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील विविध प्रश्नासंबंधी चर्चा करण्यात आली.यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सविता थोरात मॅडम कोल्हापूर जिल्ह्याचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.रेशमा पाटील मॅडम,इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ अमित सोहनी सर. प्रशासकीय अधिकारी श्री.राजेंद्र पाटील औषध निर्माण अधिकारी श्रीम.प्रियदर्शनी बागी मॅडम उपस्थित होत्या.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ प्रशांत वाडीकर यांचे स्वागत करताना डॉ भाग्यरेखा पाटील
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







