ICHMH51NEWS.IN
9921600800

इचलकरंजीतील सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक बदल

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजीतील सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक बदल

इचलकरंजी :

अनंत चतुर्दशी निमित्त दि. ६ सप्टेंबर रोजी शहरात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशमुर्ती विसर्जन मिरवणुका निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर वाहतूक कोंडी टाळण्यासाठी जिल्हा पोलिस प्रमुख योगेशकुमार गुप्ता यांनी विशेष वाहतूक नियोजन जाहीर केले आहे.

मुख्य विसर्जन मार्ग
छत्रपती शाहू महाराज पुतळा – शिवतीर्थ – जनता चौक – गांधी पुतळा – झेंडा चौक – मरगुबाई मंदिर चौक – नदी घाट असा मार्ग निश्चित करण्यात आला आहे.

वाहतुकीवरील निर्बंध व पर्यायी मार्ग
१) सांगली, जयसिंगपूरकडून येणाऱ्या वाहनांना राजवाडा–गांधी पुतळा–जनता चौक–हवामहल–शिवतीर्थ मार्ग बंद राहणार असून ही वाहतूक फॉरच्युन प्लाझा–लालनगर–थोरात चौक–आंबेडकर पुतळा मार्गे वळविण्यात येणार आहे.

२) कुरुंदवाड, अब्दुललाट, शिरढोण, हुपरी, कागल, निपाणी व कर्नाटकातून येणाऱ्या वाहनांना पंचगंगा पुल मार्गे शहरात प्रवेश बंद असेल. ही वाहतूक पाटणकोडोली–इंगळी–रुई पुल–कबनूर मार्गे वळविण्यात येईल. तसेच अब्दुललाट–हेरवाड–कुरुंदवाड–शिरढोण–टाकवडे–महासत्ता चौक–थोरात चौक–आंबेडकर पुतळा मार्गही पर्यायी म्हणून वापरण्यात येणार आहे.

३) विसर्जन मुख्य मार्गास जोडणाऱ्या सर्व उपमार्गांवरून कोणत्याही वाहनांना प्रवेश व पार्किंगस मनाई करण्यात आली आहे.

ही वाहतूक बंदी अनंत चतुर्दशीच्या दिवशी सकाळी ८ वाजल्यापासून विसर्जन मिरवणुका संपेपर्यंत लागू राहणार असून त्यानंतर मार्ग पूर्ववत खुले करण्यात येतील, अशी माहिती जिल्हा पोलिस प्रमुख गुप्ता यांनी दिली.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा