ICHMH51NEWS.IN
9921600800

लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या भाजी मार्केटची दुरावस्था; नागरिकांच्या आरोग्याला धोका

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

लाखो रुपयांची उलाढाल करणाऱ्या भाजी मार्केटची दुरावस्था; नागरिकांच्या आरोग्याला धोका.

व्हिडीओ- https://youtube.com/shorts/eszdh5w4S1M?si=beaADoDOTSi3kQLz

 

इचलकरंजी :

हु.आण्णाराम गोंडा पाटील शाळेजवळील भाजी मार्केटची दुरावस्था दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर होत चालला आहे. आरोग्य, बांधकाम, पाणीपुरवठा व इस्टेट विभागाने एकत्रित पाहणी करून तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गाळेधारक व स्थानिक नागरिकांकडून होत आहे.

मार्केटच्या आतील गटारी, पाईपलाईन, मुतारी व दलदल यामुळे अस्वच्छता निर्माण झाली असून येथून मार्ग काढणे अत्यावश्यक झाले आहे. रोज लाखो रुपयांची उलाढाल या मार्केटमधून होत असताना, आवश्यक सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.

काही ठिकाणी वारेमाप खर्च केला जात असतानाच, लाखो रुपयांचा महसूल मिळवून देणाऱ्या या भाजी मार्केटची दुरावस्था का, असा प्रश्न गाळेधारक व सामान्य नागरिक विचारत आहेत. प्रशासनाने तातडीने याकडे लक्ष देवून उपाययोजना करावी, अशी मागणी होत आहे.

सतत तक्रारीं देऊन वारंवार निवेदने देऊनही महापालिका प्रशासन दुर्लक्ष का करत आहे,बांधकाम विभागाकडे इतर विभागांनी अहवाल पाठवले असून त्यावर कारवाई कधी होणार?

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा