महानगरपालिकेशेजारीच पाणी गळती – गलथान कारभार भाग १ व्हिडीओ-
https://youtube.com/shorts/JIDk-aExcEE?si=segaxdctbzJDNCmF
इचलकरंजी :
महानगरपालिकेच्या शेजारीच गेल्या सहा महिन्यांपासून पाणी गळती सुरू असून, याकडे प्रशासनाने कायम दुर्लक्ष केले आहे. दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असून नागरिकांच्या तोंडाला मात्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.
पाणीपुरवठा विभागाकडून या गळतीबाबत विचारणा केली असता, “व्हॉल्व्ह उपलब्ध नाही” असे कारण दिले जात आहे. मात्र, अर्ध्या वर्षाहून अधिक काळ व्हॉल्व्ह उपलब्ध करून न देता ही समस्या सोडविण्यात आलेली नाही, हेच प्रशासनाच्या गलथान कारभाराचे उदाहरण असल्याची चर्चा सुरू आहे.
नागरिकांच्या पैशातून उभारलेली महापालिका व तिच्याच शेजारी संसाधनांचा असा अपव्यय होत असताना प्रशासनाचे डोळे कसेझालेत? असा सवाल नागरिक करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




