ICHMH51NEWS.IN
9921600800

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाच्या जलतरण व तायक्वांदो खेळाडूंची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाच्या जलतरण व तायक्वांदो खेळाडूंची जिल्हास्तरीय यशस्वी कामगिरी

इचलकरंजी–

जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर आणि इचलकरंजी महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शासकीय तायक्वांदो व जलतरण स्पर्धा राजीव गांधी भवन व शंकरराव पुजारी जलतरण तलाव येथे उत्साहपूर्ण वातावरणात पार पडल्या. या स्पर्धेत डी.के.ए.एस.सी. महाविद्यालयाच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश संपादन केले.

जलतरण स्पर्धेत सई शिंदे हिने ५० मीटर फ्री स्टाइल, ५० मीटर बॅक स्ट्रोक व १०० मीटर बॅक स्ट्रोक या तिन्ही प्रकारांत प्रथम क्रमांक पटकावला. तिची विभागीय स्तरावरील स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तायक्वांदो प्रकारात हर्षदा पुजारी हिने ५२ ते ५६ किलो गटात प्रथम क्रमांक, तर ज्ञानदा पुजारी हिने ४८ ते ५२ किलो वजनी गटात प्रथम क्रमांक मिळवत विभागीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली.

Advt

खेळाडूंच्या या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. के. खाडे यांनी अभिनंदन करून समाधान व्यक्त केले. खेळाडूंना क्रीडा संचालक प्रा. विनायक भोई, प्रा. मुजफ्फर लगीवाले आणि प्रबंधक श्री. आर. बी. जोग यांचे मार्गदर्शन लाभले. महाविद्यालयाचा प्राध्यापक व प्रशासकीय स्टाफ तसेच विद्यार्थी वर्गाने खेळाडूंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

खेळाडूंना शुभेच्छा देताना प्राचार्य एस के खाडे व विनायक भोई सर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा