ICHMH51NEWS.IN
9921600800

कचरा घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडीचे आयुक्तांना निवेदन, ठेकेदारांना झुकते माप दिल्याची चर्चा; १९ सप्टेंबर रोजी पुनर्भेट निश्चित

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कचरा घोटाळा प्रकरणी महाविकास आघाडीचे आयुक्तांना निवेदन, ठेकेदारांना झुकते माप दिल्याची चर्चा; १९ सप्टेंबर रोजी पुनर्भेट निश्चित

इचलकरंजी

कचरा घोटाळा प्रकरणी नेमलेल्या चौकशी समितीचा अहवाल ११ ऑगस्ट २०२५ रोजी सादर झाला होता. तथापि या अहवालामध्ये संबंधित अधिकारी व मक्तेदार यांना वाचविण्याचा प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर महाविकास आघाडीतर्फे ४ सप्टेंबर रोजी विस्ताराने निवेदन सादर करण्यात आले.

या पार्श्वभूमीवर आज प्रतिनिधी मंडळाने मा. आयुक्तांची भेट घेतली. महापालिकेचे यातून होणारे नुकसान यावेळी सविस्तरपणे मांडण्यात आले. त्यावर आयुक्त पल्लवी पाटील यांनी “मी अद्याप अहवाल व आपले पत्र वाचलेले नाही. मात्र ते वाचून निर्णयावर येईन.” असे आश्वासन देत १९ सप्टेंबर रोजी पुनर्भेटीसाठी वेळ निश्चित केली.

या भेटीत शशांक बावचकर,प्रकाश मोरबाळे, सदा मलाबादे, संभाजी सुर्यवंशी, सुशांत कोटगी यांच्यासह प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते. तर महापालिकेच्या वतीने अति आयुक्त, लेखापाल व उपायुक्त कुंभार उपस्थित होते.

दरम्यान, कचरा उठावाची दैना उडाली होतो,अद्यापही घंटागाड्या सर्वत्र नियमित पोहोचत नाहीत. सत्ताधारी गटातील काही माजी लोकप्रतिनिधींनी हा ठेका ‘मॅनेज’ केल्याची चर्चा असून चौकशी अहवालातही ठेकेदारांच्या बाजूने झुकते माप देण्यात आल्याचे बोलले जात आहे.

कचऱ्याची समस्या एवढी तीव्र होती की तत्कालीन आरोग्य अधिकाऱ्यांनी ९ ऑगस्ट रोजी ठेका रद्द करण्याबाबत रिपोर्ट सादर केला होता. मात्र त्यावर आयुक्तांनी काय कारवाई केली, हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

आयुक्तांची कसोटी

विशेष म्हणजे संबंधित मक्तेदार हा एका उपमुख्यमंत्र्यांच्या निकटवर्तीयांपैकी असल्याने प्रशासनास कारवाई करण्यात अडचणी असल्याचे एका अधिकाऱ्याने “नाव न सांगण्याच्या अटीवर” सांगितले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा