महेश कॉलनीत पाण्याची गळती कायम; विभागाच्या गलथान कारभाराबद्दल नागरिक त्रस्त, व्हिडीओ-
https://youtu.be/-HmTD1LFVOo?si=8fNrm8vpWEJJijeN
इचलकरंजी :
महेश कॉलनी, यशवंत कॉलनीच्या मागील भागात गेल्या कित्येक महिन्यांपासून पाण्याची मोठ्या प्रमाणात गळती सुरू आहे. पाणीपुरवठा विभागाला वारंवार कळवूनही अद्याप कोणतीही उपाययोजना न झाल्याने स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत.
स्थानिक रहिवासी महेश मालू यांनी सांगितले की, “गळतीबाबत अनेक वेळा विभागाकडे तक्रार करूनही प्रतिसाद मिळालेला नाही. पाण्याचा अपव्यय होत असून परिसरात अस्वच्छता निर्माण होत आहे.”
नागरिकांच्या मते, पाणीपुरवठा विभागाच्या या गलथान कारभारामुळे महापालिकेला आर्थिक तोटा तर होत आहेच, शिवाय पाणीटंचाईचा प्रश्न असताना पाण्याची नासाडी होत असल्याने नागरिकांमध्ये संताप आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




