इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माहचा शुभारंभ
इचलकरंजी
राष्ट्रीय पोषण माह हा भारत सरकारच्या महिला व बाल विकास मंत्रालय विभागाच्या वतीने दरवर्षी १२ सप्टेंबर ते ११ ऑक्टोबर या काळात साजरा केला जातो, ज्याचा उद्देश कुपोषण कमी करणे आणि निरोगी व संतुलित आहाराबाबत जागरूकता निर्माण करणे आहे. या माहअंतर्गत संतुलित पोषणाचे महत्त्व अधोरेखित करून, लोकांना योग्य खाण्याच्या सवयी अंगीकारण्यासाठी प्रोत्साहित केले जाते, ज्यामुळे त्यांची उत्पादकता वाढते आणि राष्ट्रीय विकासाला हातभार लागतो. याच पार्श्वभूमीवर आज इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयात राष्ट्रीय पोषण माहचा शुभारंभ करण्यात आला.

Advt
या कार्यक्रमाची सुरवात उपस्थितीत मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलनाने करण्यात आली. लोकांमध्ये आरोग्यासाठी पोषणाच्या महत्त्वाविषयी जागरूकता वाढवणे आणि निरोगी जीवनशैलीसाठी प्रेरित करणे हा सप्ताह केवळ व्यक्तींच्या आरोग्यासाठीच नव्हे, तर राष्ट्रीय विकास आणि आर्थिक वाढीसाठीही महत्त्वाचा मानला जातो असे रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक डॉ संतोष पोळ यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले रुग्णालयाच्या बाह्यरुग्ण विभागात कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी रुग्णालयाच्या आहारतज्ञ श्रीम. माधवी शहा,डॉ.स्वरूपा जाधव यांनी उपस्थित रुग्णांना नातेवाईकांना संतुलित पोषणाचे महत्त्व आपल्या मनोगतातून सांगितले. या कार्यक्रमाप्रसंगी रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिक्षक डॉ अमित सोहनी शरीरविकृती शास्त्रज्ञ डॉ.प्रकाश मोरे रुग्णालयाच्या अधिसेविका श्रीम.चारुशिल्पा येमल सर्व विभागाच्या परीसेवीका,बालरुग्णतज्ञ परिचारीका बाह्यरुग्ण विभागातील कर्मचारी,सार्वजनिक आरोग्य परिचारिका,रुग्णालयीन कर्मचारी रुग्ण व नातेवाईक उपस्थित होते.
राष्ट्रीय पोषण माह शुभारंभ प्रसंगी वैद्यकीय अधीक्षक डॉ.संतोष पोळ,डॉ अमित सोहनी
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800