ICHMH51NEWS.IN
9921600800

सेवा पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस भाजपा कार्यालयात उत्साहात साजरा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

सेवा पंधरवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस भाजपा कार्यालयात उत्साहात साजरा

इचलकरंजी :
सेवा पंधरवड्याच्या निमित्ताने भारतीय जनता पार्टीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अमृत महोत्सव वाढदिवस भाजपा कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी मोदींच्या कार्य व जीवनपटावर आधारित शॉर्ट फिल्म दाखवण्यात आली.

कार्यक्रमाला उपस्थित राहून माजी मंत्री प्रकाश आवाडे म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी पदावर आल्यानंतर देशाचा विकास व स्वावलंबी भारत या ध्येयाकडे देशाची वाटचाल सुरू झाली आहे. भविष्यात भारत विश्वगुरू झाल्याशिवाय राहणार नाही. मोदींप्रमाणे आपणही वाढदिवस सेवा उपक्रमांच्या माध्यमातून साजरा केल्यास स्वावलंबी भारताच्या निर्मितीत आपले योगदान होईल.”

Advt

भाजपा प्रदेश उपाध्यक्ष सुरेशराव हाळवणकर म्हणाले, “प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे भारत सुरक्षा क्षेत्रात सक्षम झाला आहे. कोणत्याही देशाची भारताकडे वाकडी नजर करण्याची हिंमत नाही. अमेरिकेने लादलेल्या कर आकारणीच्या पार्श्वभूमीवर ‘मेक इन इंडिया’ वस्तूंचा वापर करणे हीच मोदींना खरी वाढदिवस भेट ठरेल.”

यावेळी प्रास्ताविक भाजपा पश्चिम मंडल अध्यक्ष शशिकांत मोहिते यांनी केले. स्वागत ग्रामीण भाजपा अध्यक्ष बाळासाहेब माने यांनी केले. सेवा पंधरवड्याचे संयोजक अरुण कुंभार यांनी सूत्रसंचालन केले तर आभार भाजपा पूर्व मंडल अध्यक्ष श्रीरंग खवरे यांनी मानले.

कार्यक्रमास मिश्रीलाल जाजू, सुनील पाटील पैलवान, अमृतमामा भोसले, तानाजी पवार, सौ. विजया पाटील, प्रसाद खोबरे, अनिल डाळ्या, शेखर शहा, बाळासाहेब कलागते, संजय केंगार, सचिन पवार (युवा मोर्चा अध्यक्ष पूर्व), प्रमोद बचाटे (युवा मोर्चा पश्चिम मंडलाध्यक्ष), सौ. सीमा कमते, सपना भिसे, सौ. पूनम जाधव, नजमा शेख, सौ. अश्विनी कुबडगे, सौ. संगिता साळुंखे, सौ. अर्चना कुडचे, शिवानंद रावळ, महेश पाटील, अनिकेत पाटील, रवींद्र जावळे, राजू पुजारी, माधव उपाध्यय, संजय गेजगे, सिद्धार्थ पुजारी, सुमेध ओऊळकर, मनोज जाधव, बबन केटकाळे, जयकुमार काडाप्पा, दादासो पाटील, सुनिल स्वामी, ऋषभ जैन, दिलीप मुथा, विनोद कांकाणी, दत्तात्रय मांजरे, उत्तम विभुते, उमाकांत दाभोळे, दगडु वाघमोडे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सेवा पंधरवड्यात मनोगत व्यक्त करताना माजी आमदार सुरेशराव हाळवणकर

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा