ICHMH51NEWS.IN
9921600800

दि.लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लि. इचलकरंजीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

दि.लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लि. इचलकरंजीची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा खेळीमेळीत संपन्न

इचलकरंजी :
सहकार क्षेत्राची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीतील नामवंत संस्था दि. लक्ष्मी को-ऑप. प्रोसेसर्स लि. ची ६८ वी वार्षिक सर्वसाधारण सभा  उत्साहात व खेळीमेळीत संपन्न झाली.

या सभेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून इंजिनिअरिंग क्षेत्रातील जेष्ठ उद्योग व्यावसायिक श्री. डी. एम. बिरादार हे उपस्थित होते. त्यांनी संस्थेच्या वाटचालीचा गौरव करून भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

संस्थेचे व्हाईस चेअरमन श्री. राजाराम लोकरे यांनी प्रास्ताविक व स्वागत केले, तर चेअरमन श्री. मुकुंद फाटक यांनी वार्षिक अहवाल सादर केला.

यानंतर राष्ट्रीय प्रोसेसिंग कामगार संघटनेचे नेते श्री. शामराव कुलकर्णी यांनी मार्गदर्शनपर व अभ्यासू भाषण करून सभासदांना प्रेरित केले. कार्यक्रमात मान्यवरांच्या हस्ते प्रमुख पाहुणे तसेच विशेष कार्य करणाऱ्या सभासद व हितचिंतकांचा सत्कार करण्यात आला.

शेवटी संचालक श्री. सतीश बुरसे यांनी मान्यवर व उपस्थितांचे आभार मानले. सभेचा समारोप वंदे मातरमने झाला. सदर सभेचे सूत्रसंचालन संचालक श्री. उमेश कुलकर्णी यांनी केले.

सभेत बोलताना चेअरमन मुकुंद फाटक

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा