इचलकरंजी बस स्थानक “हरित स्थानक” व्हावे – नागरिक मंचकडून मागणी.पर्यावरणपूरक उपाययोजना व प्रवासी सुविधांसाठी निवेदन.

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

इचलकरंजी बस स्थानक “हरित स्थानक” व्हावे – नागरिक मंचकडून मागणी.पर्यावरणपूरक उपाययोजना व प्रवासी सुविधांसाठी निवेदन.

इचलकरंजी,
शहरातील बस स्थानकाच्या नूतनीकरण कामांमुळे प्रवाशांचा अनुभव अधिक चांगला होऊ लागला असताना, आता हे स्थानक “हरित स्थानक” म्हणून उदयास यावे, अशी मागणी इचलकरंजी नागरिक मंचने शिल्पा थोरात आगार व्यवस्थापक इचलकरंजी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
बसस्थानकाला भेट देऊन इचलकरंजी नागरिक मंचने संपूर्ण परिसराची पाहणी केली आणि पर्यावरणपूरक उपाययोजनांच्या विविध सूचना करत हे निवेदन सादर केले. सध्या संपूर्ण राज्यभर गंभीर पाणी संकट जाणवत असताना, स्थानकातील छपरावरील पावसाचे पाणी साठवून भूजल पातळी वाढवण्याचा प्रयत्न होणे अत्यंत आवश्यक असल्याचे मंचने अधोरेखित केले आहे.
पावसाचे पाणी वाया न जाता भूगर्भात मुरवावे,निवेदनात छतावरील पाणी FRP गटर्सद्वारे खाली आणून शोषखड्डे, बोअर रिचार्ज किंवा भूमिगत साठवण टाक्यांमध्ये मुरवण्याचे सुचवण्यात आले आहे.काँक्रिट केलेल्या रस्त्यांमुळे पाणी मुरण्याची शक्यता कमी असल्याने ठराविक अंतरावर ड्रिल करून खडी-वाळू भरून तयार केलेले सोक पिट्स पावसाचे पाणी जमिनीत मुरवण्यासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे निवेदनात म्हटले आहे.
सौरऊर्जा, वृक्षारोपण आणि स्वच्छता यावर भर
स्थानकाच्या छतावर सौर पॅनल बसवून संपूर्ण वीज खर्चात बचत साधता येईल, अशी सूचना करण्यात आली आहे.याबाबत लोकप्रतिनिधिंकडे मागणी करावी तसेच, स्थानकाच्या भिंतीलगत फुलझाडांची रोपटी लावून सौंदर्यीकरण करता येईल आणि पावसाळ्यात नागरिक मंच स्वतः झाडे पुरवण्याची जबाबदारी घेईल, असेही निवेदनात नमूद आहे.
नागरिक मंचने प्रवाशांच्या दृष्टीने महत्त्वाच्या अनेक बाबींकडेही लक्ष वेधले आहे. कोल्हापूर विनावाहक गाडी तात्काळ सुरू करणे,स्थानकावरील स्वच्छतागृहे स्वच्छ व कार्यक्षम ठेवणे,गाळे वाटप करून महसूल वाढवणे,ट्रॅफिक ऑफिस मागील टू-व्हीलर पार्किंग तात्काळ सुरू करण्यासाठी महापलिकेस कवळणे, तसेच लांब पल्याच्या बसेस वेळेवर व सुस्थितीत उपलब्ध करून देणे या मागण्या यामध्ये आहेत.
प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या गरजा ओळखून इचलकरंजी–कोल्हापूर मार्गावर सुसूत्र सेवा राबवावी, तसेच एकदिवसीय परतीचे प्रवास रूटस सुरू करावेत त्यामध्ये वेळेचा समन्वय असावा अशी मागणीही करण्यात आली आहे.
“प्रवाशांच्या सेवेसाठी” हे ब्रीदवाक्य खऱ्या अर्थाने सिद्ध करावे असेही म्हंटले आहे.
यावेळी आगार प्रमुख थोरात मॅडम यांनी सर्व मुद्द्यांवर वेळीच उपाययोजना केल्या जातील असे आश्वासन दिले.
यावेळी इचलकरंजी नागरिक मंचचे उमेश पाटील,राजु कोंन्नुर,अमितकुमार बियाणी,अमोल ढवळे, कल्पना माळी,डॉ.सुप्रिया माने,रुपाली माळी,सुषमा साळुंखे,बाळु भंडारी, अमित पटवा,महेंद्र जाधव,दीपक पंडीत,जतीन पोतदार,अशोक शर्मा,अभिजित पटवा उपस्थित होते.
आगार व्यवस्थापक थोरात यांना निवेदन देताना इनामचे कार्यकर्ते.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा

Read More