साखर कामगारांना १० टक्के पगारवाढीचा लाभ; प्रकाश आवाडे यांच्या पाठपुराव्याला यश
इचलकरंजी –
राज्यातील साखर कामगारांच्या १० टक्के पगारवाढीचा अध्यादेश जारी करून १ ऑक्टोबरपासून त्याची अंमलबजावणी केल्याबद्दल कलाप्पाण्णा आवाडे जवाहर साखर कारखानाचे चेअरमन कल्लाप्पाण्णा आवाडे आणि माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा जवाहर साखर कामगार संघटनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
Advt
राज्यातील साखर कामगारांना १० टक्के पगारवाढीचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र शासनाकडून अध्यादेश जाहीर करण्यात विलंब होत होता. या संदर्भात माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी शासन दरबारी सातत्याने पाठपुरावा केला आणि शासनाने अध्यादेश जारी केला. त्यामुळे ऑक्टोबरपासून पगारवाढ लागू झाली असून कामगारांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे.
याशिवाय जवाहर कारखान्यातील कामगारांना २० टक्के बोनस देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल आमदार राहुल आवाडे, व्हाईस चेअरमन बाबासो चौगुले आणि कार्यकारी संचालक मनोहर जोशी यांचा कामगार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाला कामगार संघटनेचे अध्यक्ष सर्जेराव हळदकर, उपाध्यक्ष बाळासाहेब सूर्यवंशी, सेक्रेटरी शांतिनाथ चौगुले, महावीर कल्याणी, शंकर पाटील, अविनाश कांबळे, वृषभ ऐतवडे, सुरेश पवार, श्रीकांत करडे, बाबू दोड्डणावर तसेच संचालक सुनील पाटील, महेश पाटील आणि केन कमिटी चेअरमन दादासो सांगावे यांची उपस्थिती होती.
आ.राहुल आवाडे व माजी मंत्री प्रकाश आवाडे यांचा सत्कार करताना कामगार संघटनेचे पदाधिकारी.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







