इचलकरंजी महापालिका निवडणूक काळात शहापूर हद्दीतील ४५ व्यक्तींना प्रवेशबंदी
उपविभागीय दंडाधिकाऱ्यांचा एकतर्फी मनाई आदेश; ११ ते १६ जानेवारीदरम्यान बंदी
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक शांतता भंग होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने प्रतिबंधात्मक कारवाई करत ४५ व्यक्तींना शहर व परिसरात प्रवेशबंदी आदेश लागू केला आहे. हा आदेश उपविभागीय दंडाधिकारी दीपक शिंदे यांनी पारित केला आहे.
शहापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सचिन सूर्यवंशी यांनी संभाव्य अनुचित प्रकार, दहशत व कायदा-सुव्यवस्थेचा धोका लक्षात घेऊन ४५ व्यक्तींविरोधात प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार दिनांक ११ जानेवारी २०२६ ते १६ जानेवारी २०२६ या कालावधीत संबंधित व्यक्तींना इचलकरंजी महानगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र तसेच शहापूर पोलीस ठाणे हद्दीतील शहापूर, तारदाळ, खोतवाडी, कोरोची व यड्राव या गावांमध्ये प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे.
प्रवेशबंदी घालण्यात आलेल्या व्यक्तींची नावे पुढीलप्रमाणे :
पिंटू उपेंद्र रॉय, अमोल प्रभाकर कोंदारे, तौफिक अब्दुल शिरगुप्पे, राहुल विश्वनाथ बसवेश्वर ऊर्फ एकोंडे, अजित आप्पासो नाईक, केशव ऊर्फ सोन्या संजय कदम, श्रीधर विद्याधर गस्ती, शाहरुख आरिफ सुतार, किशोर सुरेश जैद ऊर्फ जिंदाल, सूरज अब्दुल शेख, मनिष रामविलास नागोरी, मिंटू उपेंद्र रॉय, हरिकिशन नंदकिशोर पुरोहित, अनिल संपत मुळे, मुबारक महंमद शेख, शाम रंगराव लाखे, पैगंबर कासिम मुजावर, दीपक अनिल सावंत, अमोल अशोक माळी, अजय भानुदास कुलकर्णी, सूरज मनोहर शिके, प्रविण दत्तात्रय रावळ, अजित अशोक माळी, गणेश सुरेश आडेकर, अनिल अंतुसा गिणानी, प्रकाश पांडुरंग गिलबिले, निलेश बाळासो पाटील, अनिकेत सावंता नरळे, अनिल यशवंत मोरे, पांडुरंग ऊर्फ जिवा मधुकर पाटील, श्रीकांत ऊर्फ शुभम विलास गळंगे, उमेश राजाराम मोठे, गोपाल ऊर्फ बानू आप्पासो शिंदे, अमर सुनिल वाघ, राजू निसार देसाई, संदीप प्रकाश गायकवाड, प्रविण धनाजो पाटील, प्रसाद प्रशांत जगताप, शुभम राजेश वायचळ, ऋषिकेश बाबासाहेब पाटील, तोहीद आर्शद साबनूरकर, योगेश ऊर्फ बारक्या सुरेश कवडे, समिर अकबर नुल्ला, पिंटू ऊर्फ धनाजो पांडुरंग जाधव व अक्षय सावंतराव नरळे.
निवडणूक कालावधीत शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ही कारवाई करण्यात आली असून, आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. ही जाहीर प्रसिद्धी सर्व वृत्तपत्रे व माध्यमांनी प्रसिद्ध करावी, असे आवाहन उपविभागीय दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







