ICHMH51NEWS.IN
9921600800

कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

कंत्राटी कामगारांच्या शोषणाविरोधात २८ सप्टेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

इचलकरंजी, दि. २३ :

सरकारी, निमसरकारी तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कायमस्वरूपी कामांचे कंत्राटीकरण वाढत असून कंत्राटी कामगारांचे मोठ्या प्रमाणात शोषण होत असल्याचा आरोप महापालिका, नगरपरिषद, नगरपंचायत कर्मचारी संघटना समन्वय समितीचे अध्यक्ष प्राचार्य ए. बी. पाटील यांनी केला आहे. या प्रश्नांकडे शासन व प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सोमवार, दि. २८ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

कंत्राटी सफाई कामगारांना किमान वेतन, भविष्य निर्वाह निधी (पीएफ), ईएसआयसी आरोग्य विमा, ग्रॅज्युएटी, साप्ताहिक व राष्ट्रीय सुट्ट्या यांसारख्या मूलभूत सुविधा मिळत नसल्याचा आरोप पाटील यांनी केला. अनेक वर्षे कायमस्वरूपी स्वरूपाचे काम करूनही कामगारांना २० ते ३० वर्षे कंत्राटी पद्धतीने काम करावे लागत असल्याने सामाजिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनला आहे.

कंत्राटी कामगारांमध्ये अनुसूचित जाती-जमाती व मागासवर्गीयांची संख्या मोठी असून आरक्षणाच्या हक्कावरही परिणाम होत असल्याचे त्यांनी नमूद केले. काही ठिकाणी कामगारांचे बँक खाते, पासबुक व चेकबुक कंत्राटदारांकडे ठेवले जात असल्याचेही त्यांनी सांगितले.

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी होणाऱ्या या आंदोलनास पत्रकारांनी उपस्थित राहून सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य ए. बी. पाटील यांनी केले.

ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा