कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाच्या अध्यक्षपदी अशोक देगावकर; उपाध्यक्षपदी मधुकर पांढरे
इचलकरंजी, दि. २३ : श्रीमद वीरशैव कुरूहीनशेट्टी कोष्टी समाजाची सन २०२६-२७ ते २०३०-३१ या कालावधीची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध पार पडली. त्यानंतर नूतन कार्यकारिणीच्या पदाधिकाऱ्यांची निवड करण्यासाठी संचालकांची बैठक सभा अध्यक्ष सतीश सदाशिव कोष्टी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
या बैठकीत अध्यक्षपदी अशोक कृष्णा देगावकर व उपाध्यक्षपदी मधुकर महादेव पांढरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तसेच खजिनदारपदी जगदिश रामचंद्र कोष्टी, तर सेक्रेटरीपदी सूर्यकांत दत्तात्रय रुकडे यांची निवड करण्यात आली.
नूतन अध्यक्ष अशोक देगावकर व उपाध्यक्ष मधुकर पांढरे यांनी समाजापुढील विविध प्रश्न सोडविण्यास प्राधान्य देणार असल्याचे सांगितले. समाजातील विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक उपक्रम, आरोग्यविषयक कार्यक्रम तसेच युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येणार आहेत. सामाजिक एकता आणि समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी प्रयत्न करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.
सभा अध्यक्ष सतीश कोष्टी यांनी नूतन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या. यावेळी सुनील मल्लापा कोष्टी, आनंद प्रभाकर बिडकर, चंद्रकांत शिवलिंग पांढरे, सुनील बाबुरव कोष्टी, राजकुमार जगन्नाथ देगांवकर, आनंद चंद्रकांत कोकळकी, चंद्रकांत बाळासाहेब कोष्टी, शितल रमाकांत बिडकर, हर्षवर्धन राजेंद्र कोष्टी, अनिता राजू बिडकर आदी संचालक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800


