ICHMH51NEWS.IN
9921600800

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कामांचे पुन्हा उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांचा अवमान-शशांक बावचकर

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या कामांचे पुन्हा उद्घाटन; मुख्यमंत्री फडणवीस यांचा अवमान-शशांक बावचकर

इचलकरंजी :
शहरातील विकास कामांच्या उद्घाटनावरून राजकीय वाद निर्माण झाला आहे. १५ डिसेंबर २०२५ रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महानगरपालिकेअंतर्गत सुमारे ५११ कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन व लोकार्पण करण्यात आले होते. मात्र त्याच कामांचे पुन्हा ३ एप्रिल रोजी स्थानिक लोकप्रतिनिधींकडून उद्घाटन करण्यात आल्याने काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस शशांक बावचकर यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
बावचकर यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे म्हटले आहे की, आधीच उद्घाटन झालेल्या कामांचे पुन्हा उद्घाटन करणे म्हणजे मुख्यमंत्र्यांचा अवमान आहे. यामध्ये ९.५ कोटींचे नाट्यगृह नूतनीकरण, १२ कोटींचे महासत्ता चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा रिंग रोड बळकटीकरण तसेच अण्णाभाऊ साठे कंपाउंडच्या कामांचा समावेश आहे.
सत्ताधाऱ्यांनी या कृतीमागील उद्देश स्पष्ट करावा, अशी मागणी करत बावचकर यांनी आरोप केला की, महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केवळ जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी हा प्रकार केला जात आहे. तसेच, आचारसंहिता संपून दोन महिने उलटूनही कामे सुरू करण्यात झालेल्या विलंबावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
“नवीन कामे नसल्यामुळे केवळ प्रसिद्धीसाठी जुनीच कामे पुन्हा उद्घाटनाच्या नावाखाली पुढे आणली जात आहेत,” असा आरोप करत त्यांनी सत्ताधाऱ्यांनी जनतेच्या दैनंदिन प्रश्नांवर लक्ष केंद्रित करावे, असे आवाहन केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा