खर्चीवाल्यांच्या मजुरीसाठी बोलावलेल्या आजच्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष
चंदुरात मेळावा संपन्न
इचलकरंजी–
खर्चीवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरीवाढी संदर्भात
प्रांतअधिकारी कार्यालयात आज सोमवारी बोलावलेल्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तरी या पार्श्वभूमीवर चंदुरमध्ये आयोजित यंत्रमागधारकांच्या मेळाव्यात बोलताना पुंडलिकराव जाधव यांनी हे आंदोलन यशस्वी करण्यासाठी कारखानदारांनी संघटित व्हावे असे आवाहन केले.
गेल्या काही दिवसापासून खर्चेवाल्या यंत्रमागधारकांच्या मजुरी वाढीसाठी काम बंद आंदोलन सुरू आहे. तर या आंदोलनाची तीव्रता वाढत असताना काही कारखान्यातील बिमे कापण्याचा प्रकारही घडला. या सर्व पार्श्वभूमीवर यंत्रमागधारकांच्या प्रतिनिधींनी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मुंबईत भेट घेऊन माहिती दिली. यानुसार त्यांनी तातडीने मीटिंग घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी यांनी सोमवारी प्रांताधिकारी कार्यालयात दुपारी बारा वाजता ट्रेडिंग असोसिएशन व खर्चीवाला प्रतिनिधीची बैठक बोलावली आहे. याकडे सर्व यंत्रमागधारकांचे लक्ष लागले आहे.
या सर्व पार्श्वभूमीवर चंदुरमध्ये खर्चीवाल्या यंत्रमाग धारकांचा भव्य मेळावा आयोजित करण्यात आला होता. यात मार्गदर्शन करताना पुंडलिकराव जाधव यांनी आंदोलन यशस्वी करण्यासाठी संघटित होणे काळाची गरज असून जोपर्यंत मजुरीवाढ मिळत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू राहील असा निर्धार व्यक्त केला. त्या मिळवला मोठ्या संख्येने यंत्रमागधारक होते.
सुरुवातीला नंदकुमार लोखंडे यांनी स्वागत केले. तर शहाजी भोसले, विश्वनाथ मेटे, धर्मराज जाधव यांनी मार्गदर्शन केले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




