आडकी कुटुंबाचा स्तुत्य उपक्रम. विवाहातील अक्षतांचा खर्च अन्नदानास.
इचलकरंजी
इचलकरंजी शहरातील उद्योजक राम आडकी व हिरामनी आडकी यांचे चिरंजीव अजित व सोलापूर येथील मिना व मुरली कनकी यांची मुलगी अंकिता यांचा विवाहसोहळा नुकताच पार पडला,या विवाहसोहळ्यात फक्त स्टेजवर उपस्थित मोजक्या मान्यवरांनी अक्षता टाकल्या तर इतर सर्व उपस्थिताना प्रत्यक्ष भेटून आशीर्वाद देण्याचे आवाहन आडकी परिवारातर्फे करण्यात आले.
विवाहसोहळ्यातील अक्षतांचा खर्च वाचवून ५००१/- रुपयांची देणगी आडकी परिवाराने इचलकरंजी नागरिक मंच संचलित अन्नदान श्रेष्ठदान उपक्रमास दिली.
इचलकरंजी नागरिक मंच तर्फे गेल्या ५ वर्षांपासून इचलकरंजी शहरातील ५० निराधार व्यक्तींसाठी रोज दोन वेळचे जेवण घरपोच केले जाते.ज्यांना मोफत मिळते ते सुद्धा घेता येत नाही अशा नागरिकांना अन्नदानाचा उपक्रम गेल्या ५ वर्षांपासून अखंडित सुरू आहे.या उपक्रमास मदत करून आडकी परिवाराने एक आगळा वेगळा आदर्श समाजासमोर ठेवला आहे.विवाहसोहळ्यात उपस्थित मान्यवर व मित्रपरिवाराणे आडकी परिवाराच्या निर्णयाबद्दल त्यांचे अभिनंदन केले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




