ICHMH51NEWS.IN
9921600800

मानवतेसाठी प्रत्येक क्षण समर्पित असावा : सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मानवतेसाठी प्रत्येक क्षण समर्पित असावा : सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज

रेंदाळ :
संत निरंकारी मिशनतर्फे युगदृष्टा बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या स्मृतिदिनानिमित्त हरियाणातील समालखा येथे भव्य संत समागमाचे आयोजन करण्यात आले. श्रद्धा, भक्ती आणि अध्यात्मिक चेतनेने भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या समागमाला देश-विदेशातील लाखो श्रद्धाळूंनी उपस्थिती लावली.
सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज तसेच निरंकारी राजपिता रमितजी यांच्या सानिध्यात झालेल्या या समागमात भक्तांनी सद्गुरूंच्या अमृतमय विचारांचा लाभ घेत आत्मिक शांती, आनंद आणि दिव्य प्रेरणेचा अनुभव घेतला. यावेळी मार्गदर्शन करताना सद्गुरु माता सुदिक्षाजी महाराज यांनी “मानवतेच्या सेवेसाठी प्रत्येक क्षण समर्पित असावा” असा संदेश दिला. प्रेम, सेवा, विनम्रता आणि समर्पण या मूल्यांचा स्वीकार करून समाजात बंधुभाव वाढविण्याचे आवाहनही त्यांनी केले.
कोल्हापूर विभागातील १४ शाखांमधून कोल्हापूर शहर, साळवाडी, जयसिंगपूर, मालेवाडी आणि नेरली या पाच ठिकाणी ‘समर्पण दिवस’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात हजारो भाविक भक्तांनी सहभागी होत बाबा हरदेव सिंहजी महाराज यांच्या मानवतावादी विचारांना अभिवादन केले.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा