सील केलेली मालमत्ता फोडून घुसखोरी; तिघांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर :
कर्ज थकवल्यानंतर बँकेकडून सील करण्यात आलेल्या मालमत्तेचे कुलूप व सील तोडून बेकायदेशीर प्रवेश केल्याप्रकरणी तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना काबनूर (ता. हातकणंगले) येथे उघडकीस आली.
याबाबत हिरो हौसिंग फायनान्सचे प्राधिकृत अधिकारी स्वप्निल गोविंदराव चव्हाण यांनी फिर्याद दिली आहे.
पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ओंकार लोखंडे,स्नेहल लोखंडे, कमल लोखंडे यांनी संबंधित कंपनीकडून ३८ लाख ७७ हजार ९३३ रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्जफेड न केल्याने सरफेसी कायद्यानुसार कंपनीने मालमत्तेचा ताबा घेऊन ती सील केली होती.
त्यानंतर आरोपींनी सील केलेल्या मिळकतीत घुसखोरी करून कुलूप व सील तोडले. तसेच कंपनीचे वसुली अधिकारी रवी महापुरे यांना फोनवरून दमदाटी व शिवीगाळ केल्याचाही आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
या प्रकरणी संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकॉ. इंदुलकर करत आहेत.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





