एसटीपी भूमिपूजनावरून सत्ताधाऱ्यांत नाराजी; सभेत पडसाद उमटण्याची शक्यता
इचलकरंजी :
एसटीपी प्लॅन्टच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून सत्ताधारी गटातच नाराजीची ठिणगी पडल्याची चर्चा शहराच्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. कार्यक्रमासाठी केवळ आमदार राहुल आवाडे समर्थक काही नगरसेवकांना निमंत्रण देण्यात आल्याचा आरोप होत असून, इतर नगरसेवकांना जाणीवपूर्वक डावलण्यात आल्याची भावना व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनाही निमंत्रण नसल्याने हाळवणकर समर्थकांमध्ये तीव्र अस्वस्थता निर्माण झाली आहे.
या प्रकारावरून काही नगरसेवकांनी महापौर व गटनेत्यांसमोर उघड नाराजी व्यक्त केल्याची माहिती समोर येत आहे. सत्ताधारी गटातीलच काही नगरसेवक प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर नाराज असून, महासभेत आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
आज होणाऱ्या महासभेत या नाराजीचे पडसाद उमटतात का, तसेच सत्ताधाऱ्यांतील अंतर्गत मतभेद उघड होतात का, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






