इचलकरंजीच्या स्वागत कमानीस बाळासाहेब ठाकरे यांचे नाव द्या : संजय चौगुले
इचलकरंजी : हातकणंगले-कोरोची मार्गे इचलकरंजी शहरात प्रवेश करताना पंचरत्न मंगल कार्यालयासमोरील स्वागत कमानीस “हिंदुहृदयसम्राट, शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे प्रवेशद्वार” असे नामकरण करून त्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आली. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय चौगुले यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने महापौर, उपमहापौर, विरोधी पक्षनेते व आयुक्त यांना निवेदन दिले.
२०२६-२७ हे वर्ष हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे जन्मशताब्दी वर्ष असल्याने इचलकरंजी शहराच्या स्वागत कमानीस त्यांचे नाव देऊन त्यांना अभिवादन करावे, अशी भावना शिवसैनिकांनी व्यक्त केली. शहरप्रमुख तथा नगरसेवक शिवाजी पाटील व नगरसेवक सयाजी चव्हाण यांनी आगामी महासभेत हा विषय मांडून तात्काळ मंजुरी मिळवण्यासाठी पाठपुरावा करू, असा विश्वास व्यक्त केला.
महापौर उदय धातुंडे यांनी निवेदन स्वीकारून विषय सकारात्मकपणे घेऊन लवकरच मंजुरी देण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपजिल्हाप्रमुख मलकारी लवटे, शहरप्रमुख धनाजी मोरे, नगरसेवक मनोज भाट, महिला आघाडी उपजिल्हासंघटिका मंगलताई मुसळे, स्नेहल मस्के, लक्ष्मी बुरले, मधुमती खराडे, युवासेना शहरप्रमुख सागर जाधव, शहरसमन्वयक रतन वाझे, विजय जोशी, दत्ता साळोखे, बसय्या स्वामी, भरत शिवलिंगे, राजेंद्र मोकाशी, अजय घाडगे, सुनिल अथने, उमेश पाटील, अरविंद मस्के, दादा पारखे, अविनाश धुळुगडे, गणेश जंगटे, गणेश शर्मा, संतोष लवटे, शितल मगदूम, जोहेब हलगले, दीपक नरदेकर, सागर सातपुते, मारुती बन्ने, दिलीप कोरवी, दिलीप पुरोहित, विक्रम पुरोहित, हर्षद बैरागदार, सुनिल कांबळे, पवन मेटे, ओम बागडे, सागर पाटील, विनायक पाटील, बाबासाहेब जाधव, चेतन आगलावे यांच्यासह आजी-माजी पदाधिकारी, शिवसैनिक व युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






