ICHMH51NEWS.IN
9921600800

ना.बा. घोरपडे नाट्यगृहाचे काम रखडले; मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी मुदतवाढ अथवा दरवाढ दिल्यास न्यायालयात जाणार : उमाकांत दाभोळे

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

ना.बा. घोरपडे नाट्यगृहाचे काम रखडले; मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी

मुदतवाढ अथवा दरवाढ दिल्यास न्यायालयात जाणार : उमाकांत दाभोळे

इचलकरंजी :
शहराच्या सांस्कृतिक वैभवाचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या ना.बा. घोरपडे नाट्यगृहाच्या नूतनीकरण कामामध्ये मोठा विलंब होत असल्याचा आरोप करत संबंधित मक्तेदारावर कठोर कारवाई करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते उमाकांत दाभोळे यांनी केली आहे. याबाबत त्यांनी महापौर, उपमहापौर व आयुक्त यांना निवेदन दिले आहे.
दाभोळे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, १५ डिसेंबर २०२५ रोजी नाट्यगृहाच्या नूतनीकरणासाठी कार्यादेश देण्यात आला होता. संबंधित काम सहा महिन्यांत पूर्ण करण्याची अट असतानाही आजपर्यंत काम पूर्ण झालेले नाही. प्रत्यक्ष पाहणीमध्ये काम अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचे दिसून आले असून त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे.
नाट्यगृहासाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर झालेला असताना नियोजित मुदतीत काम पूर्ण न होणे ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. कामातील विलंबामुळे महानगरपालिकेच्या आर्थिक हिताला फटका बसत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
संबंधित मक्तेदारास कोणत्याही परिस्थितीत मुदतवाढ देऊ नये, दरवाढ अथवा अतिरिक्त आर्थिक लाभ मंजूर करू नयेत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच करारातील अटींनुसार दंडात्मक कारवाई करून संबंधित मक्तेदाराला ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली.
कामातील विलंबामुळे झालेले नुकसान संबंधितांकडून वसूल करावे, संपूर्ण कामाची तात्काळ तांत्रिक तपासणी करून अहवाल सार्वजनिक करावा तसेच जबाबदार अधिकारी व संबंधित घटकांची चौकशी करावी, अशी मागणीही दाभोळे यांनी केली आहे.
दरम्यान, प्रशासनाने नियम डावलून संबंधित मक्तेदारास मुदतवाढ, दरवाढ किंवा आर्थिक लाभ देण्याचा प्रयत्न केल्यास जनहितासाठी न्यायालयीन लढा उभारला जाईल, असा इशाराही उमाकांत दाभोळे यांनी दिला आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा