इचलकरंजी महापालिकेची सर्वसाधारण सभा आज रोजी; मालमत्ता कर मोजणीचा विषय गाजणार, बायोमायनिंग विषय गुंडाळला?
इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेची सर्वसाधारण सभा आज १२.१५ वाजता प्रशासकीय इमारतीतील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात आयोजित करण्यात आली आहे. या सभेत शहर विकास, नामकरण, स्वच्छता व सुशोभीकरणासंदर्भातील महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होणार आहे.
सभेत कै. श्रीमंत नारायणराव बाबासाहेब घोरपडे यांच्या पुतळ्याचे सुशोभीकरण, जगज्योती महात्मा बसवेश्वर पुतळा उभारणी,विविध भागांचे नामकरण,शहापूर ओढ्यात कचरा टाकणाऱ्यांवर कारवाई, मृत जनावरांसाठी विद्युत दाहिनी उभारणी,उद्याने व ऑक्सिजन पार्क देखभाल, कबनूर येथील खुल्या जागेचा विकास तसेच मिळकत कर आकारणीसाठी त्रयस्थ एजन्सी नियुक्ती यांसह विविध विषयांवर निर्णय घेतले जाणार आहेत.सभेच्या शेवटी महापौरांच्या परवानगीने ऐनवेळचे विषयही घेतले जाणार आहेत. इचलकरंजी शहरातील मिळकतधारकांची त्रयस्थ यंत्रणेमार्फत मोजणी करण्याचा विषय गाजणार आहे,यामध्ये मनपाच्या उत्पन्नात वाढ होणार असल्याने याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
बायोमायनिंग बाबत सभागृहाचे मौन.
सुरवातीच्या १-२ सभामध्ये बायोमायनिंग कामकाजाविषयी विरोधकांनी जोरदार आरोप केले,पाहणी केली मात्र हा विषय तडीस न नेता विरोधक टप्प्याटप्प्याने शांत होत गेले यामागचे गौडबंगाल काय असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत तर सुरवातीच्या सभेनंतर सर्व काम नियमानुसार असल्याची बतावणी करणाऱ्या प्रशासनाने याबाबत कमालीची गुप्तता बाळगली असून याबाबत आलेल्या माहिती अधिकार अर्जनाही उत्तरे दिली जात नसल्याने प्रशासन आणि लोकप्रतिनधीच्या भूमिकेवर संशय वाढला आहे
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800






