मनसेच्या हातकणंगले लोकसभा बैठकीत संघटन बांधणीवर भर,शनिवारी जिल्हा संपर्क अध्यक्षांचा इचलकरंजी दौरा; बूथ बांधणी व सदस्य नोंदणीचा आढावा
इचलकरंजी :
हातकणंगले लोकसभा कोल्हापूर जिल्हा बैठकीचे आयोजन गुरुवारी इचलकरंजी येथील मनसे शहर कार्यालयात करण्यात आले. बैठकीत पक्षसंघटना मजबूत करण्याबरोबरच आगामी दौऱ्याचे नियोजन, बूथ बांधणी, सदस्य नोंदणी आणि स्थानिक प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील होते. त्यांनी सांगितले की, कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष, नगरसेवक व गटनेते यशवंत किल्लेदार तसेच जिल्हा संपर्क अध्यक्ष नंदकुमार चिले हे शनिवार, दि. २३ मे रोजी पक्षसंघटना बांधणी व लोकसभा आढावा बैठकीसाठी इचलकरंजी दौऱ्यावर येणार आहेत.
या दौऱ्यात हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील सर्व पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.
बैठकीस जिल्हाध्यक्ष राजु दिंडोर्ले, इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, हातकणंगले तालुकाध्यक्ष वैभव भोसले, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, माजी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, जिल्हा उपाध्यक्ष भगवंत जांभळे, विशाल मोरे, संजय पाटील, शाहूवाडी तालुकाध्यक्ष बाळासाहेब कदम, पन्हाळा तालुकाध्यक्ष लखन लादे, मनोहर जोशी, महेश शेंडे यांच्यासह प्रमुख पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800







