मनसे जिल्हा संपर्क अध्यक्षांचा इचलकरंजी दौरा उत्साहात; संघटन विस्तारावर भर
इचलकरंजी:
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कोल्हापूर जिल्हा संपर्क अध्यक्ष यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांच्या इचलकरंजी दौऱ्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दौऱ्याची सुरुवात शिवतीर्थ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्प अर्पण करून करण्यात आली. तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यानंतर दाते मळा येथील रोटरी क्लबमध्ये जिल्ह्यातील पदाधिकारी व महाराष्ट्र सैनिकांची बैठक पार पडली. या बैठकीत पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी जोमाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या. रिक्त पदांची तातडीने पूर्तता करणे, संघटनात्मक शिस्त राखणे आणि पक्षवाढीसाठी प्रत्येक पदाधिकाऱ्याने सक्रिय भूमिका बजावणे आवश्यक असल्याचे मार्गदर्शन यशवंत किल्लेदार आणि नंदकुमार चिले यांनी केले.
बैठक कोल्हापूर जिल्हाध्यक्ष दौलतराव पाटील आणि राजू दिंद्रले यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. यावेळी इचलकरंजी शहराध्यक्ष रवी गोंदकर, जिल्हा सचिव प्रतापराव पाटील, जिल्हा उपाध्यक्ष राजेंद्र निकम, हातकणंगले तालुका अध्यक्ष वैभव भोसले, माजी उपनगराध्यक्ष संतोष चव्हाण, शिरोळ तालुका अध्यक्ष कुमार पुदाले, पन्हाळा तालुका अध्यक्ष लखन लादे, शाहूवाडी तालुका अध्यक्ष बाळासाहेब कदम यांच्यासह विविध आघाड्यांचे पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीत आगामी काळात जिल्ह्यात मनसेची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला. कार्यकर्त्यांनी पक्षवाढीसाठी गावागावांत संपर्क वाढवून संघटन विस्ताराला गती देण्याचा संकल्प केला.
मेळाव्यादरम्यान घेतलेले छायाचित्र
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800





