ICHMH51NEWS.IN
9921600800

घनश्याम इनानी यांच्या कार्यालयावर दगडफेक; तिघांसह १५ जणांवर गुन्हा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

घनश्याम इनानी यांच्या कार्यालयावर दगडफेक; तिघांसह १५ जणांवर गुन्हा

इचलकरंजी :
यंत्रमाग कामगारांच्या मजुरीवाढ आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कापड व्यापारी घनश्याम इनानी यांच्या कार्यालयावर झालेल्या दगडफेक प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी शिवसेना प्रणित महाराष्ट्र सेना संघटनेचे अध्यक्ष नंदकुमार लोखंडे, कोल्हापूर जिल्हा पॉवरलूम असोसिएशनचे अध्यक्ष शहाजी भोसले, विशाल पाडेकर यांच्यासह १० ते १५ अनोळखी व्यक्तींविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी (दि. २३) सायंकाळी पाचच्या सुमारास विवेकानंद कॉलनीतील घनश्याम इनानी यांच्या कार्यालयासमोर मजुरीवाढीच्या मुद्द्यावरून जमाव जमला. या जमावाने कार्यालयावर दगडफेक केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. घनश्याम मुलचंद इनानी (वय ७५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दाखल गुन्ह्याचा तपास  पोलीस उपनिरीक्षक वाघमारे करीत आहेत.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा