नामदेव समाज आयोजित आंतरशालेय स्पर्धांमध्ये बालाजी विद्या मंदिर, मराठी मिडीयम हायस्कूल (नारायण मळा) या शाळांना सर्वसाधारण विजेतेपद
इचलकरंजी १२
संत शिरोमणी नामदेव महाराजांच्या ६७४ व्या संजीवन समाधी महोत्सवानिमित्त घेण्यात आलेल्या आंतरशालेय स्पर्धांमध्ये श्री बालाजी विद्या मंदिर आणि डिकेेेटीई संस्थेच्या मराठी मिडीयम हायस्कूल (नारायण मळा) या शाळांनी अनुक्रमे प्राथमिक आणि माध्यमिक गटात सर्वसाधारण विजेतेपद पटकावले. मुंबई उच्च न्यायालयातील वकील ह. भ. प. पद्मनाभ पिसे, नामदेव समाजोनती परिषदेेचे संदीप लचके, सुभाष मुळे, ऍड ज्ञानेश्वर पाटसकर, रणजीत माळवदे यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पारितोषिक वितरण करण्यात आले.
श्री नामदेव समाज सेवा मंडळ आणि श्री नामदेव युवक संघटना यांच्या वतीने आयोजित चित्रकला, सामान्यज्ञान, निबंध, बुद्धिबळ, वक्तृत्व, पाठांतर, गायन, वेशभूषा आदी स्पर्धांमध्ये शहर आणि परिसरतील 106 शाळातील विविध गटातील सुमारे अडीच हजार विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वैयक्तिक आणि सांघिक गटातील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते नामदेव पूजन करण्यात आले, कुमारी शची हळदे या विध्यार्थीनीने सादर केलेल्या नामदेव वंदनेनंतर समाज सेवा मंडळाचे अध्यक्ष राजन उरूणकर यांनी स्वागत व प्रास्ताविक केले, स्पर्धा अहवाल वाचन प्रा.अनिल अवसरे यांनी,.युवक संघटनेचे अध्यक्ष संदीप कल्याणकर यांनी आभार प्रदर्शन तर सूत्रसंचालन सौ सीमा उरूणकर यांनी केले. यावेळी मधुकर खटावकर, अनंतराव कुडाळकर, उमाकांत कोळेकर,चंद्रकांत पाडळकर,अनंतराव बोंगाळे सौ. सरोज उरूणकर यांच्यासह शहर आणि परिसरातील समस्त नामदेव समाज बांधव, विद्यार्थी-विद्यार्थिनी, शिक्षक, पालक उपस्थित होते. सामुदायिक पसायदान आणि राष्ट्रगीत होऊन कार्यक्रमाची सांगता झाली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800