आपटे वाचन मंदिराची वसंत व्याख्यानमाला २ मे पासून
इचलकरंजी –
शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी आपटे वाचन मंदिराची ५३ वी वसंत व्याख्यानमाला शुक्रवार दि. २ मे २०२५ ते शुक्रवार दि. ९ मे २०२५ पर्यंत होणार आहे. शुक्रवार दि. २ मे २०२५ रोजी महाराष्ट्र विधानपरिषदेचे सभापती मा. प्रा. राम शिंदे, मुंबई यांची प्रकट मुलाखत होणार आहे. शनिवार दि. ३ मे २०२५ रोजी वंचितांसाठी कार्य करणाऱ्या स्नेहालय या संस्थेचे प्रमुख मा. डॉ. गिरीश कुलकर्णी, अहिल्यानगर यांचे आशयसंपन्न जगण्याची प्रकाशवाट या विषयावर व्याख्यान होणार आहे. रविवार दि. ४ मे २०२५ रोजी ‘मनसमझावन’ कार आणि प्रधान आयकर आयुक्त मा. श्री. संग्राम गायकवाड, पुणे यांच्याशी मुक्त संवाद होणार आहे. सोमवार दि. ५ मे २०२५ रोजी संपादक, दै. सकाळ पुणे मा. श्री. सम्राट फडणीस यांचे माध्यमे आणि समाज या विषयावर व्याख्यान होणार आहे. मंगळवार दि. ६ मे २०२५ रोजी कॉसमॉस बँक पुणेच्या व्यवस्थापन मंडळाचे अध्यक्ष सीए मिलिंद काळे यांचे सहकार समृध्दीचे आधुनिक सूत्र या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दि. ७ मे २०२५ रोजी डॉ. निर्मोही फडके, श्री. योगेश केळकर, सौ. वंदना प्रवीण गुजरे हे अस्पर्शित प्रीतीचा शोध हाज्येष्ठ साहित्यिक जयवंत दळवी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त त्यांच्या साहित्यातील प्रीतीच्या छटा उलगडणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. गुरुवार दि. ८ मे २०२४ रोजी सुप्रसिद्ध लेखिका मा. अंजली चिपलकट्टी, पुणे यांचे माणूस असा का वागतो? या विषयावर माणसाच्या व्यक्तिगत अन् सामूहिक वर्तनाचा वैज्ञानिक वेध घेणारे व्याख्यान होणार आहे. शुक्रवार दि. ९ मे २०२५ रोजी संवेदनशील अभिनेत्री आणि मराठी शाळांची सदिच्छादूत मा. चिन्मयी सुमीत, मुंबई यांची मुलाखत होणार आहे. व्याख्यानमालेतील सर्व व्याख्याने डी. के. टी. ई. पटांगण, राजवाडा चौक, इचलकरंजी येथे सायंकाळी ७.०० वाजता होणार आहेत. तरी सर्व नागरीकांनी या व्याख्यानमालेस अगत्याने उपस्थित रहावे असे आवाहन ग्रंथालयाच्या वतीने करण्यात आले आहे.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800