अहमद मुजावर यांच्या सामाजिक कार्याचा गौरव
इचलकरंजी/प्रतिनिधी –
सोलापूर येथील पाक्षिक ‘जिओ और जिने दो’ च्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात इचलकरंजीतील सामाजिक कार्यकर्ते अहमद बाबालाल मुजावर यांचा सामाजिक कार्याबद्दल गौरव करण्यात आला. तसेच अमानत पत संस्थेचे चेअरमन जमीर हाजी याकूबभाई बागवान यांच्यासह राज्यभरातील विविध नामवंत व्यक्तींचा ‘फख्रे मिल्लत’ अॅवार्ड देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती. तर अध्यक्षस्थानी माजी आमदार डॉ. वजाहत मिर्झा होते.
सोलापूर येथील निर्मलकुमार फडकुले सभागृहात संपन्न कार्यक्रमात माजी मंत्री खान अजहर हुसेन, अब्दुल करीम सालार, हाजी शौकत भाई तांबोळी, बागवान एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष जब्बारशेठ बागवान, सलीमभाई गुलबर्गावाले, इतिहासतज्ञ श्रीमंत कोकाटे, माजी आमदार नरसय्या आडम, माजी पोलिस उपायुक्त इसाक बागवान, माजी आमदार जमीर अहमद चंद्रपूर, अहमदनगर जिल्हा उर्दू साहित्य परिषदेचे जिल्हाध्यक्ष सलीमखान पठाण, साप्ताहिक काशीद चे संपादक आयुब नल्लामंदू, उर्दू कॉन्फरन्सचे सचिव कॅप्टन शफी, एस. एम. इरफान, गुफरान इनामदार, अनिस आवटी, अमीन करमरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
अहमद मुजावर यांनी राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात आपल्या कार्यातून वेगळी ओळख निर्माण केली आहे. समाजकार्यात ते सदैव अग्रस्थानी असतात. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांच्या सामाजिक कार्याबद्दल गौरविण्यात आले.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800