इचलकरंजी
इचलकरंजी येथील शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज श्रावणातील दुसऱ्या सोमवारी महामृत्युंजय यज्ञा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाडू मातीचे अलंकारिक शिवलिंग बनविण्यात आले होते. पर्वत रांगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्ताने करण्यात आली होती.
श्रावण मासातला दुसऱ्या सोमवारी शहरातील शिवमंदिरांमध्ये पहाटेपासूनच शिवभक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. प्रत्येक श्रावणी सोमवारी वाहिली जाणारी शिवामूठ महत्त्वाची मानली जाते. याचे महत्त्वही वेगवेगळे आहे. श्रावण महिन्यात अनेक व्रतवैकल्य असतात. यंदा श्रावणात ५ सोमवार असल्याने या महिन्याला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवारी विशिष्ट धान्याची शिवामूठ महादेवाला अर्पण केली जाते. भगवान महादेवांनी कामासूरावर विजय मिळवला होता, तसे आपल्या मनातील, विचारातील वासना नियंत्रणात राहण्यासाठी श्रावणातील व्रत आयोजित असल्याची मान्यता आहे. जी व्यक्ती देहावर आणि मनावर नियंत्रण मिळवू शकते, ती कोणतीही गोष्ट मिळू शकते, असा विश्वास श्रावणी सोमवारच्या उपासनेतून आणि व्रतामधून प्राप्त होतो, असे म्हटले जाते. दरम्यान, श्रावण सोमवार निमित्त अनेक मंदिरांमध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्याचप्रमाणे शहरातील शिवराणा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने आज शिवराणा गौशाळेत अखंड महामृत्युंजय यज्ञा चे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शाडू मातीचे अलंकारिक शिवलिंग बनविण्यात आले होते. पर्वत रांगातील शिव आराधनेची प्रतिकृती या निमित्ताने करण्यात आली होती. महामृत्युंजय मंत्र हा अतिशय शक्तीशाली मंत्रांपैकी एक आहे, ज्याचा जप केल्याने माणूस दीर्घायुषी आणि शक्तिशाली बनतो. रुद्राक्ष जपमाळेने महामृत्युंजय मंत्राचा जप केल्यास दुप्पट लाभ मिळतो. शिवपुराणानुसार या मंत्राचा जप केल्याने अकाली मृत्यू आणि रोगांपासून मुक्ती मिळते. यावेळी शिवभक्तांनी मोठ्या प्रमाणात हजेरी लाऊन शिवलिंगाचे दर्शन घेतले . त्याचबरोबर महामृत्युंजय यज्ञामध्ये आहुती दिली.

Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800