ICHMH51NEWS.IN
9921600800

फ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

फ्लिपकार्टमध्ये डीकेटीईच्या एमबीएच्या पंधरा विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड

इचलकरंजी:
येथील डीकेटीई संस्थेतील एमबीए विभागाने प्लेसमेंट व उदयोगसहभाग क्षेत्रात उल्लेखन्नीय यश संपादन करीत देशातील अग्रगण्य ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टच्या सप्लाय चेन मॅनेजमेंट विभागातील प्रतिष्ठीत सशुल्क इंटर्नशिपसाठी तब्बल १५ विद्यार्थ्यांची निवड झाली आहे.
भारताच्या ई-कॉमर्स क्षेत्रात अग्रस्थानावर असलेल्या फ्लिपकार्टमध्ये विद्यार्थ्यांना लॉजिस्टिक्स, वेअरहाउस मॅनेजमेंट, इन्व्हेंटरी कंट्रोल, सप्लाय चेन ऑपरेशन्स आणि वितरण व्यवस्थापन यांसरख्या महत्वपूर्ण क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळणार आहे.
फ्लिपकार्टने २५ विद्यार्थ्यांना पुणे येथे ट्रेनिंगसाठी बोलवले होते यामधून १५ विद्यार्थ्यांची निवड केली व एमबीए विभागातील श्रेया निरवाने, सायमा पटेकरी, सौरभ मगदूम,ॠषिकेश पाटील,पवन रावळ,हर्षवर्धन नगारे,संकेत शिंदे, मृणाल मुसळे, व्यंकटेश सोनटक्के, निकिता कुमावत, समिक्षा कुगे,भार्गवी गुरसाले, ऐश्‍वर्या चौगुले, भाव्या कासलीवाल व प्राची पाटील या विद्यार्थ्यांची फ्लिपकार्टने निवड केली आहे. या ट्रेनिंगचा फायदा भविष्यकाळात प्लेसमेंटसाठी होणार आहे.
फ्लिपकार्टमध्ये डीकेटीईचे विद्यार्थी व्यवस्थापनावर काम करणार असून कंपनीच्या वतीने विविध विभागातील तज्ञ सदर विद्यार्थ्यांना या काळात मार्गदर्शन करणार आहेत. याशिवाय प्रशिक्षण कालावधीत विद्यार्थ्यांचे कार्यक्षमता व त्यांच्यातील कौशल्य वृत्तीची पडताळणी करुण त्यांना थेट नोकरीसाठी घेण्याचे संकेत दिले आहेत. फ्लिपकार्टसारख्या प्रतिष्ठीत कंपनीमध्ये एकाच वेळी १५ विद्यार्थ्यांची इंटर्नशिपसाठी निवड होणे ही संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची,प्रशिक्षण व प्लेसमेंट विभागाच्या प्रभावी कार्याची आणि विद्यार्थ्यांच्या मेहनत, जिदद व गुणवत्तेची साक्ष आहे.
या यशाबददल डीकेटीईचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी मंत्री प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे, कार्यकारी संचालक रवी आवाडे व सर्व ट्रस्टींनी शुभेच्छा दिल्या.  विद्यार्थ्यांना संस्थेच्या संचालिका प्रा. डॉ.सौ.एल.एस.आडमुठे, विभागप्रमुख डॉ. पी.एस.जाधव, डॉ. व्ही.एस.गुरव, टीपीओ ए.एस.गणपते यांचे मार्गदर्शन लाभले.
 डीकेटीईमधील एमबीए विभागातील विद्यार्थ्यांची फ्लिपकार्ट या नामांकित कंपनीमध्ये प्रशिक्षणासाठी निवड झालेले विद्यार्थी
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा