ICHMH51NEWS.IN
9921600800

मालमत्ता कर वेळेत भरा, दुसऱ्या सहामाहित संयुक्त करावर १० टक्के सवलत मिळवा

👇बातमी ऐकण्यासाठी येथे क्लिक करा

मालमत्ता कर वेळेत भरा, दुसऱ्या सहामाहित संयुक्त करावर १० टक्के सवलत मिळवा

इचलकरंजी :
इचलकरंजी महानगरपालिकेने सन २०२६-२७ या आर्थिक वर्षासाठीची मालमत्ता कराची देयके तयार केली असून, करदात्यांना प्रोत्साहन देण्यासाठी विशेष सवलत योजना जाहीर केली आहे. ३१ जुलै २०२६ पूर्वी मालमत्ता कराचा संपूर्ण भरणा करणाऱ्या मिळकतधारकांना दुसऱ्या सहामाहीच्या संयुक्त कररकमेवर १० टक्के सवलत देण्यात येणार आहे.
महापालिकेने कर भरणा प्रक्रिया अधिक सुलभ आणि नागरिकाभिमुख करण्यासाठी डिजिटल सुविधांचा विस्तार केला आहे. नागरिकांना मालमत्ता कराची बिले महापालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहेत. संकेतस्थळावरून बिल डाउनलोड करण्यासह थेट ऑनलाइन कर भरण्याची सुविधाही उपलब्ध आहे.
नागरिकांच्या सोयीसाठी व्हॉट्सअॅप चॅटबॉट सेवाही सुरू करण्यात आली आहे. महापालिकेच्या अधिकृत ७०३००३३६३६ या क्रमांकावर ‘Hi’ असा संदेश पाठविल्यानंतर चॅटबॉटच्या सूचनांनुसार मालमत्ता क्रमांक नोंदविल्यास संबंधित कर बिल मोबाईलवर त्वरित उपलब्ध होणार आहे.
ऑनलाइन सुविधेबरोबरच ऑफलाइन कर भरण्याची व्यवस्थाही कायम ठेवण्यात आली आहे. ज्या नागरिकांना प्रत्यक्ष कार्यालयात जाऊन कर भरायचा आहे, त्यांच्यासाठी महानगरपालिका मुख्य कार्यालय तसेच सर्व विभागीय कार्यालयांमध्ये रोख रक्कम स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.
वेळेत कर भरणा करून १० टक्के सवलतीचा लाभ घ्यावा आणि शहराच्या विकासकामांना सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी केले आहे.
ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA

घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

पुढे वाचा