प्रा.वनिता पाटील यांना पीएचडी.
इचलकरंजी:
येथील वनिता देवगोंडा पाटील यांनी ‘महाराष्ट्र शासनाचे कृषिधोरण आणि दक्षिण महाराष्ट्र १९६० ते २०१० : चिकित्सक अभ्यास’ या विषयावर पीएच.डी. पदवी संपादन केली आहे. त्यांनी इतिहास विषयांतर्गत हा संशोधन प्रबंध पूर्ण केला. त्यांच्या संशोधनामध्ये महाराष्ट्र शासनाच्या विविध कृषी धोरणांचा, पंचवार्षिक योजनांचा, सहकार चळवळीचा, जलसिंचन विकासाचा, दक्षिण महाराष्ट्रातील कृषी परिवर्तनाचा तसेच शेतकरी आंदोलनांचा चिकित्सक अभ्यास करण्यात आला आहे. त्यांच्या संशोधन कार्यास मार्गदर्शक डॉ. संघमित्रा सरवदे मॅडम यांच्यासह इतिहास विभाग प्रमुख डॉ. अवनीश पाटील सर, डॉ. भारतभूषण माळी सर यांचे मार्गदर्शन लाभले.
त्यांना मा. अण्णासाहेब डांगे कला आणि वाणिज्य महाविद्यालयाचे संस्थापक मा. अण्णासाहेब डांगे, प्राचार्य डॉ. निरंजन कुलकर्णी, प्राध्यापक रवींद्र पाटील तसेच जयवंतराव आवळे शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मा. जयवंतराव आवळे, संस्थेचे अध्यक्ष मा. संजय आवळे, जयवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिलावर जमादार सर तसेच डॉ. माधुरी खोत, डॉ.एवन आवळे यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800



