महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सच्या गव्हर्निंग कौन्सिलवर आमदार राहुल आवाडे यांची पुनर्निवड
इचलकरंजी :
महाराष्ट्रातील व्यापार, उद्योग, कृषी व सेवा क्षेत्रातील अग्रगण्य शिखर संस्था असलेल्या महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड ॲग्रीकल्चरच्या गव्हर्निंग कौन्सिल सदस्यपदी आमदार राहुल आवाडे यांची पुन्हा निवड करण्यात आली आहे. संस्थेची निवडणूक नुकतीच बिनविरोध पार पडली. त्यानंतर झालेल्या नव्या संचालक मंडळाच्या बैठकीत त्यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली.
उद्योग, सहकार, कृषी व समाजकारण क्षेत्रात सक्रिय असलेल्या आमदार आवाडे यांनी विविध जबाबदाऱ्या यशस्वीपणे सांभाळल्या आहेत. ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले आहेत. महाराष्ट्र चेंबरच्या माध्यमातून उद्योग, व्यापार, कृषी व सेवा क्षेत्राच्या विकासासाठी त्यांनी मोलाचे योगदान दिल्याने त्यांच्या कार्याची दखल घेत ही पुनर्निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीबद्दल विविध स्तरांतून अभिनंदन होत आहे.
Author: ICHMH51 NEWS ABHIJIT PATWA
घडामोडी वस्त्रनगरीच्या... इचलकरंजी शहरातील चालू घडामोडी, ब्रेकिंग न्यूज आपल्याला समजाव्यात यासाठी हे पोर्टल सुरू केले असून नागरी समस्यांना वाचा फोडून त्या मार्गी लावण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. अधिक माहिती,बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क- अभिजित राजेंद्र पटवा,इचलकरंजी. 9921600800




